Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या…”; जयंतीनिमित्त शिवसेनेची मोदी सरकारकडे मोठी मागणी

संपूर्ण देशभरामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह यांनी अभिवादन केले आहे. शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 23, 2025 | 12:32 PM
'बाळासाहेब ठाकरे हे दिलदार व्यक्तिमत्त्व होतं, पण...'; गणेश नाईक यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

'बाळासाहेब ठाकरे हे दिलदार व्यक्तिमत्त्व होतं, पण...'; गणेश नाईक यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपला दबदबा निर्माण करणारे नेते बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. राजकीय वर्तुळामध्ये आणि शिवसेना समर्थकांकडून मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या नेत्यांकडून मोठ्या उत्साहामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जात आहे. यामध्ये ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारकडे बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.

मुंबईमध्ये खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्राला स्वाभिमानाची, लढण्याची प्रेरणा देण्याच काम माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. आजही पिढ्या बदलल्या महाराष्ट्रातल्या. पण येणारी प्रत्येक मराठी पिढी ही माननीय शिवसेनाप्रमुखांच ऋण मान्य करुन बाळासाहेबांचा विचार पुढल्या पिढीला देऊन पुढे जाते. बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राला, देशाला समाजाला बऱ्याच गोष्टी दिल्या, ते सत्तेवर कधी आले नाहीत. म्हणजे मुख्यमंत्री, राज्यपाल कधी झाले नाहीत. ही सगळी पद सहकाऱ्यांना, सामान्य शिवसैनिकांना दिली. सामान्यातल्या सामान्य माणसाला शूर-वीर करण्याच काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं,” अशा भावना खासदार राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दुसरी शिवसेना हा चायना माल

दोन्ही शिवसेनेचे दोन मेळावे होत असल्यामुळे देखील संजय राऊतांनी खोटक टोला लगावला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “शिवसेनेचे दोन गट वेगवेगळ्या सभा वैगेर घेतायत. ज्यांना बाळासाहेब ठाकरे माहित आहेत, जे खरोखर बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, त्यांना एक गोष्ट समजली पाहिजे, माननीय शिवसेनाप्रमुखांनी उभ्या आयुष्यात वेगळा गट निर्माण केला नाही. त्यामुळे गट हा शब्द चुकीचा आहे. जिथे मातोश्री आहे, तिथे शिवसेना आहे. बाजारात डुप्लीकेट औषध असतात, कपडे असतात, असा शिवसेनेच्या नावाने चायना माल बाजारात आला असेल तर तो तात्पुरता असतो. दिवाळीत चिनी फटाके येते. वात पेटते पण वाजत नाही. अशा गोष्टी भाजपाकडून निर्माण झाल्या आहेत. भाजपा स्वत: चिनी माला आहे. म्हणून ते राजकारणात चिनी मालाचा पुरवठा करत असतात,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केली आहे. ते म्हणाले की, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना शिवसेनेतर्फे आवाहन आहे, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरव करा, ही शिवसेनेची मागणी आहे, तर तुम्ही खरे. हिंदू ह्द्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार मिळायलाच पाहिजे” अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

Web Title: Mp sanjay raut demands bharatratna for hinduhridaysamrat balasaheb thackeray on birth anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2025 | 12:32 PM

Topics:  

  • Balasaheb Thackeray
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut Slams Narendra Modi:चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान
1

Sanjay Raut Slams Narendra Modi:चहा विकल्याचा पुरावा द्या, राजकारण सोडेन!; संजय राऊतांचे नरेंद्र मोदी आणि भाजपला उघड आव्हान

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
2

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ
3

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.