Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sushma Andhare : ‘शिंदेंसाठी बाळासाहेब ठाकरे फक्त पॉलिटिकल कार्ड’; सुषमा अंधारेंचा शिंदे गटावर घणाघात

शायना एन.सी. यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या घटनेवरून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका करत बाळासाहेबांचा वापर केवळ ‘पॉलिटिकल कार्ड’ म्हणून केला जात असल्याचा आरोप केला.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 19, 2026 | 07:28 PM
sushma-andhare-eknath-shinde-controversy

sushma-andhare-eknath-shinde-controversy

Follow Us
Follow Us:
  • सुषमा अंधारे यांचा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल
  • एकनाथ शिंदेंसाठी बाळासाहेब ठाकरे हे फक्त पॉलिटिकल कार्ड
  • शायना एन.सी यांना समज देण्याची गरज 
Sushma Andhare : मुंबई : शिंदेसेनेकडून सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या विरोधात आंदोलन करून हे पुस्तक बंद करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शायना एन. सी. यांनी अनावधानाने बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याने ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, “शिंदेंच्या लोकांनी पत्रकार परिषदेच्या नावाखाली काही माकडचाळे केले आणि ते करत असताना नेमका हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला. बाळासाहेबांचा अवमान या महाराष्ट्रातला कुठलाही शिवसैनिक, ज्याच्या काळजात बाळासाहेब जिवंत आहे, तो मान्य करणार नाही, सहन करणार नाही. पुढे म्हणाल्या, या घटनेमुळे तीव्र संतापाची लाट उसळली आणि यावर शिंदे काय नेमकी भूमिका घेतात, याकडे महाराष्ट्राचं लक्ष होतं, पण शिंदे काय स्डँण्ड घेणार?”

पावलो-पावली बाळासाहेबांचा अवमान करता – अंधारे

पुढे त्या म्हणाल्या, “दरवेळेला शिंदेंचे प्रवक्ते उल्लेख करताना उबाठा असा उल्लेख करतात. तुमचा स्वार्थ साध्य झाला नाही म्हणून तुमचा उद्धव ठाकरेंबद्दल राग आहे. पण तुम्ही जो उबाठा म्हणताना जो बाठा बाठा म्हणता, त्यात तुम्ही पावलो-पावली बाळासाहेबांचा अवमान करता. तुमचे प्रवक्तेही अवमान करतात आणि त्यावर तुम्ही मुग गिळून गप्प असता किंवा ती तुमची छुपी संमती असते, हे आम्हाला कालच कळाले आहे. कारण काल तुम्ही शायना एन.सी यांच्या झालेल्या कृतीबद्दल तिला समज देण्याऐवजी, तिच्यावर कारवाई करण्याऐवजी आणि या घटनेवर दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी, असं काही घडलंच नाही, असं होऊच शकत नाही आणि असं झालंच नाहीये, असं म्हणाले.”

Sonia Gandhi Book Controversy : पुस्तकामुळे सोनिया गांधी वादाच्या भोवऱ्यात अडकणार; सात्यकी सावरकरांनी थेट दिला इशारा

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “तुम्ही त्या बाईला सरळ सरळ पाठीशी घातलं आणि त्या बाईने आज माफी मागितली. ज्या अर्थी तिने माफी मागितली, त्या अर्थी त्या बाईलाही हे मान्य आहे की, आपल्या हातून अत्यंत विपरित आणि आकरित असा प्रकार घडलेला आहे. पण हे घडलेलं असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी मात्र यावर जाणीवपूर्वक अतिशय सोयीस्कर मौन बाळगलं, याचा स्पष्ट अर्थ असा की, एकनाथ शिंदे, तुमच्यासाठी बाळासाहेब ठाकरे हा आदराचा, आपुलकीचा, श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय अजिबात नाही.”

भाजपसाठी जसे स्वातंत्र्यवीर सावरकर हे पॉलिटिकल कार्ड आहे अगदी तसेच एकनाथ शिंदे यांच्यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे फक्त आणि फक्त सत्ता स्वार्थाला झाकणारे पॉलिटिकल कार्ड आहे.
@mieknathshinde @OfficeofUT
#डुप्लिकेट https://t.co/GYEto2iGsU
— SushmaTai Andhare (@andharesushama) November 19, 2026

‘सोनिया व राहुल यांच्या फोटोला जोडे मारण्याची हिंमत उबाठाने दाखवावी…’; शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांची मागणी

पुढे त्या म्हणाल्या, “हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे फक्त आणि फक्त एक पॉलिटिकल कार्ड आहे, जे तुम्ही वारंवार इनकॅश करण्याचा प्रयत्न करता. ज्या पद्धतीने भाजपासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर हे पॉलिटिकल कार्ड आहेत, तसंच तुमच्यासाठी बाळासाहेब ठाकरे हे तुमच्यासाठी पॉलिटिकल कार्ड आहे. कालच्या घटनेने तुमचा बुर्खा फाटलेला आहे. तुमचा खरा चेहरा काय आहे ते कळालं आहे.”

💡

Frequently Asked Questions

  • Que: शायना एन.सी. यांच्या कोणत्या कृतीवरून वाद निर्माण झाला?

    Ans: सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या विरोधातील पत्रकार परिषदेदरम्यान शायना एन.सी. यांनी अनावधानाने बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याने वाद निर्माण झाला.

  • Que: सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदेंवर काय आरोप केला?

    Ans: बाळासाहेब ठाकरे यांचा वापर शिंदे गटाकडून केवळ ‘पॉलिटिकल कार्ड’ म्हणून केला जात असल्याचा आरोप अंधारे यांनी केला.

  • Que: या प्रकरणावरून कोणत्या दोन गटांमध्ये राजकीय संघर्ष वाढला?

    Ans: या घटनेवरून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत.

Web Title: Shaina nc balasaheb thackeray photo sushma andhare eknath shinde controversy political news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • Balasaheb Thackeray
  • Eknath Shinde
  • political news
  • sushma andhare

संबंधित बातम्या

Shiv Sena UBT Protest: बाळासाहेबांचा फोटो फाडल्याने धुळ्यात शिवसेना आक्रमक!
1

Shiv Sena UBT Protest: बाळासाहेबांचा फोटो फाडल्याने धुळ्यात शिवसेना आक्रमक!

Eknath Shinde Helicopter: एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे एक इंजिन सुरू, दुसरे इंजिन..; ऐनवेळी उड्डाण रद्द, पुण्याला कारने रवाना
2

Eknath Shinde Helicopter: एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे एक इंजिन सुरू, दुसरे इंजिन..; ऐनवेळी उड्डाण रद्द, पुण्याला कारने रवाना

‘सोनिया व राहुल यांच्या फोटोला जोडे मारण्याची हिंमत उबाठाने दाखवावी…’; शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांची मागणी
3

‘सोनिया व राहुल यांच्या फोटोला जोडे मारण्याची हिंमत उबाठाने दाखवावी…’; शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांची मागणी

Sonia Gandhi Book Controversy : पुस्तकामुळे सोनिया गांधी वादाच्या भोवऱ्यात अडकणार; सात्यकी सावरकरांनी थेट दिला इशारा
4

Sonia Gandhi Book Controversy : पुस्तकामुळे सोनिया गांधी वादाच्या भोवऱ्यात अडकणार; सात्यकी सावरकरांनी थेट दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.