
MP Sanjay Raut press Conference on Thackeray Brothers Alliance mumbai shivsena
शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे आशिर्वाद घेऊन युतीसाठी पत्रकार परिषद घेणार आहेत. 12 वाजता होणाऱ्या या पत्रकार परिषदेमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची घोषणा होणार आहेत. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, नाशिक आणि पुणे या महापालिकांच्या जागावाटपा संदर्भात आमची चर्चा झाली आहे अशी माहिती देखील संजय राऊत यांनी दिली आहे. त्याचबरोबर कोण भडभुंजे काय बोलत आहे याकडे लक्ष देण्याची गरज नाही. हे सगळे लाचार आणि बुटचाटे लोक आहेत. त्या दिल्लीच्या बुटचाट्यांनी त्यांचं राजकारण करावं. त्याने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करु नये. ठाकरे बंधूंच्या या युतीमध्ये त्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.
हे देखील वाचा : ठाकरे बंधूंचे शक्तीप्रदर्शन! बाळासाहेब ठाकरेंना वंदन करुन करणार ऐतिहासिक युती, संजय राऊतांची माहिती
मराठी जनतेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले असल्याची भावना खासदार राऊत यांनी व्यक्त केली. यावर माध्यमांनी मुंबईंमध्ये तुमच्या समरो मराठी नेत्यांचे आव्हान असणार आहे आणि त्यांना मतदान करणारे देखील मतदार मराठीच आहेत असा प्रश्न माध्यमांनी विचारला. यावर राऊत म्हणाले की, हा एक महाराष्ट्राला मिळालेला श्राप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी माणसानेच स्वराज्याला विरोध केला. शिवाजी महाराजांनी सव्वा दोनशे लढाया लढल्या, त्यातील किमान 200 लढाई ते स्वकीयांविरोधात लढले आणि तरी त्यांनी स्वराज्यांचं तोरण बांधलं, असे मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : भाजपा पुन्हा देणार धक्का! काँग्रेससह मनसेचे दिग्गज नेते भाजपाच्या वाटेवर
पुढे ते म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरेंना देखील मराठी माणसांनीच विरोध केला. तरी त्यावर मात करुन त्यांनी शिवसेना निर्माण केली आणि राजकारणामध्ये यशस्वी झाले. हे प्रत्येक राज्यामध्ये होत असतं. आपलेच लोक आपल्या विरोधात उभे राहत असतात. त्यांना स्वाभिमान नको आहे. जे दिल्लीचे बुटचाटे आहेत त्यांनी दिल्लीच्या बुटचाट्यांचा एक मेळावा देखील घेतला होता. ते प्रॅक्टिस करत असतात की चांगल्या प्रकारे कसे दिल्लीचे बुट चाटता येतील याची ते रंगीत तालीम करत असतात. पण महाराष्ट्रातील तळागळातील मराठी माणूस हा शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या मागे भंकमपणे उभा आहे.” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.