भाजपा पुन्हा देणार धक्का! काँग्रेससह मनसेचे दिग्गज नेते भाजपाच्या वाटेवर
गेल्या वर्षभरापासून भारतीय जनता पक्षात विरोधी पक्षातून इनकमिंग जोरात सुरू आहे. पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक आमदार यांच्या विरोधानंतरही भाजपाचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी अनेकांना प्रवेश दिले. त्यामुळे विरोधक त्यात धक्क्यातून सावरत नाही तोच मंत्री गिरीश महाजन यांनी आता विरोधकांना एक मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. यात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात खिंडार पडण्याची शक्यता वर्तविली जात असून, गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले एक बलाढ्य नेते भाजपावासी होणार असल्याचे समजते. या नेत्यांची भाजपाच्या वरिष्ठांशी चर्चा संपली असून, या दोन दिवसांत ते भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात दिसतील, असे सूत्रांनी म्हटले आहे
दरम्यान, पक्षाने ज्यांच्यावर महापालिका निवडणुकीत महत्वाची जबाबदारी दिलेली आहे तेच नेते पक्ष सोडून भाजपावासी होणार असल्याने या दोन्ही पक्षाना महापालिका निवडणुकीत अडचणीचा खमना करावा लागण्याची शक्यता आहे, नाशिक महापालिकेत शंभर प्लसचा नारा दिलेल्या भाजपाने आता १२२ ची तयारी सुरू कैली की काय? अशी चर्चा त्याच्याच कार्यकत्यांमध्ये सुरू झाली आहे.
पक्षात उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच लागली आहे, त्यातच शिंदे गट आणि अजित पवार गट युती करण्यासाठी मागे लागलेले असताना भाजपात इनकमिंग जोरात सुरूच आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत यूतीसाठी दोन्ही पक्षांना झुलवत ठेवायचे अन् ऐनवेळी स्वबळाचा नारा यायचा, असा भाजपाचा प्लॅन असल्याची चचर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ज्या ठिकाणी भाजपाकडे सक्षम उमेदवार नाही किंवा सक्षम उमेदवार असला तरी तो आपल्या बरोबरचे उमेदवार निवडून आणू शकत नाही, अशा ठिकाणच्या विरोधी पक्षाच्या नेत्यावर भाजपाने आपले जाळे टाकण्यास अधीपासूनच सुरुवात केली होती, या जाळ्यात या दोनही पक्षातील करही नेते अडकले आहेत. आता है नेते कोण? आणि त्याचा दोन्ही पक्षाला किती मोठा फटका बसेल? है देणारा काळच ठरवेल.






