Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : “नमो नमो अन् जय श्रीराम म्हणा, गॅस आपल्या दारात; LPG गॅस तुटवड्यावरुन विरोधकांची बोचरी टीका

LPG Gas Cylinder : खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशामध्ये निर्माण झालेल्या तेलाच्या तुटवड्यावर भाष्य केले. तसेच मोदी सरकारवर टीका केली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 12, 2026 | 01:44 PM
MP Sanjay Raut Press Conference target modi government over LPG Gas Shortage marathi news

MP Sanjay Raut Press Conference target modi government over LPG Gas Shortage marathi news

Follow Us
Follow Us:
  • भारतामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा पडला आहे
  • यावरुन खासदार संजय राऊतांची टीका
  • मोदी सरकारवर साधला निशाणा
Maharashtra Politics : मुंबई : आखाती देशांमध्ये युद्धस्थिती निर्माण झाल्यामुळे तेल आणि इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतावर इंधनच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) मिळणे मुश्कील झाले असून याचा फटका सामान्य लोकांना बसला आहे. व्यावसायिक गॅस मिळत नसून यामुळे हॉटेल, मेस आणि खानावळींवर परिणाम झाला आहे. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. नमो नमो म्हणा किंवा जय श्रीराम म्हणा गॅस आपल्या दारामध्ये येईल अशी टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार संजय राऊत यांनी तेल टंचाईमुळे सरकारवर निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, फक्त जय श्रीराम सिलेंडर म्हणा, घरपोच सिलेंडर मिळणार. नमो नमो हा मंत्र जपल्यास पेट्रोल आणि डिझेलही दारात येणार. आपल्या देशात अंधभक्ती पराकोटीला गेल्याचे ते म्हणाले. देशात गॅस टंचाईचे संकट असताना भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर क्राईसीस कोणता आहे तर केरळ, तामिळनाडूमध्ये, आसाममध्ये निवडणुका जिंकणं हा त्यांच्यासमोरील अजेंडा आहे, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

हे देखील वाचा : ‘धनुष्यबाण आणि शिवसेना’ कुणाची? साडे तीन वर्षांच्या संघर्षाचा शेवट आज होणार का? सुप्रीम कोर्टात सुनावणी

पुढे खासदार राऊत म्हणाले की, “नमो नमो नमो हा एक मंत्र आहे. हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला पेट्रोल-डिझेल घरपोच मिळेल. तुमच्या दारात ही मंडळी पाईप घेऊन येतील. नमो नमो नमो म्हणा आणि जय श्रीराम म्हणा, सर्व काही मिळेल इतक्या स्तरावर या देशात अंधभक्ती वाढली आहे. यामुळे या देशातील प्रमुख प्रश्नाची चिंता कुणालाच वाटत नाही,” अशी जोरदार टीका खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली आहे.

हे देखील वाचा : विरोधकांनी संसदेत मांडली चूल! गॅस तुटवड्यावरुन सरकारवर आगपाखड

खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “सध्याच्या परिस्थितीमध्ये देशाचे पंतप्रधान सध्या कुठं आहेत? पंतप्रधान हे केरळमध्ये निवडणुकीचा प्रचार करत आहेत. तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत आहेत. देशातील जनतेसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गॅस, पेट्रोल-डिझेल, खाद्यतेलाचं संकट आले आहे. पण त्याच्यावरती पंतप्रधानांकडून अद्याप कोणतीही कारवाई नाही, कोणतंही साधं वक्तव्य आलेलं नाही. ते केवळ निवडणुका जिंकण्यासाठी आणि त्यासाठी सरकारी तिजोरीचा अमाप खर्च करत आहेत. देशाचं दुर्देव आहे की अशा प्रकारचे संवेदनशील शून्य पंतप्रधान लाभले,” अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी जोरदार निशाणा साधला आहे.

 

Web Title: Mp sanjay raut press conference target modi government over lpg gas shortage marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • LPG Gas
  • LPG gas cylinder
  • Modi government

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.