Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आमदार सुरेश धस यांच्या तांडवाला शासकीय आशीर्वाद…”; खासदार संजय राऊतांचा घणाघात

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बीड हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. तसेच सत्ताधारी भाजप नेते सुरेश धस यांच्याबाबत देखील मत व्यक्त केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 28, 2025 | 12:30 PM
'1 रुपयाचंही काम नाही, 73 कोटींची बोगस बिले उचलली', सुरेश धस यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

'1 रुपयाचंही काम नाही, 73 कोटींची बोगस बिले उचलली', सुरेश धस यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यामुळे सर्व राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीडमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामध्ये धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असलेला आरोपी वाल्मिक कराडवर देखील प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकरणामध्ये भाजप नेते आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार घणाघात केले. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील हे प्रकरण उचलून धरले. सुरेश धस यांना शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय ते बीडमधल्या दहशतवादा विरोधात तांडव करणार नाहीत, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले आहे. खासदार राऊत यावेळी म्हणाले की, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आधी तिथे आंदोलन सुरूच होतं. मिस्टर कराड हे इस्पितळात आहेत त्यांचं कुठे काय दुखत आहे मला माहित नाही.  त्यांच्यासाठी एक बंगला रिकामी केला आहे. हे अजित पवार यांना दिसत नाही का? हे सर्व धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असे सुरेश धस सांगत आहेत. ते भाजपचे आमदार आहेत. अंजली दमानिया यांचाही भाजपचा संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार त्याच्यामुळे काय होईल? काही दिवसात वाल्मीक कराड राजकारणात येतील आणि भाजपच्या गटात बसलेले असतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे खासदार संजय राऊत यांनी सुरेश धस यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “सुरेश धस यांनी तर तांडव केला आहे. बीड मधल्या दहशतवाद विरोधात तांडव सुरू आहे. आणि त्या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही. सुरेश धस हे सरकारी पक्षाचे आमदार आहेत. त्यांच्याकडे पक्की माहिती आहे. त्यामुळे आमदार धस याचं ऐकलं पाहिजे. ते त्या भागातल्या आमदार आहेत त्यांना तिकडेची माहिती असेल आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी दिलेल्या जबाबामध्ये दोन राजकारण्यांची नावे घेतली आहे. यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे देखील नाव घेतले आहे. या प्रकरणासंबंधात खासदार संजय राऊत म्हणाले की, “याबाबत माझ्याकडे जास्त माहिती नाही. याच्याशी माझा काही जास्त संबंध नाही. झिशान सिद्दिकी यांच्या वडिलांचे निधन झालं आता त्यांनी काय स्टेटमेंट दिलं, पोलिसांची काय भूमिका आहे ते ठरवाव लागेल, मला माहित नाही मला माहिती घ्यावी लागेल. तुम्ही ज्यांची नावं घेत आहात त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी मत व्यक्त करणार नाही,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Mp sanjay raut react on mp suresh dhas political support by bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • sanjay raut
  • Santosh Deshmukh Murder
  • Suresh Dhas

संबंधित बातम्या

Thackeray Brothers Alliance: ठरलं तर, ठाकरे बंधु एकत्र येणार…! संजय राऊतांची मोठी घोषणा
1

Thackeray Brothers Alliance: ठरलं तर, ठाकरे बंधु एकत्र येणार…! संजय राऊतांची मोठी घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण-भात तूप खाऊन? बाजीराव पेशवे सुद्धा मांसाहार करत; खासदार संजय राऊतांचा दावा
2

छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण-भात तूप खाऊन? बाजीराव पेशवे सुद्धा मांसाहार करत; खासदार संजय राऊतांचा दावा

जगदीप धनखड झालेत बेपत्ता; संजय राऊत आणि कपिल सिब्बल फिरवतायेत एकच संशयचा ‘कित्ता’
3

जगदीप धनखड झालेत बेपत्ता; संजय राऊत आणि कपिल सिब्बल फिरवतायेत एकच संशयचा ‘कित्ता’

निवडणूक आयोग दुतोंडी गांडुळ तर देवेंद्र फडणवीसांकडे चोरीचा माल; खासदार संजय राऊत यांचा जोरदार घणाघात
4

निवडणूक आयोग दुतोंडी गांडुळ तर देवेंद्र फडणवीसांकडे चोरीचा माल; खासदार संजय राऊत यांचा जोरदार घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.