आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार
मुंबई : दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यापूर्वी महाराष्ट्राच्या निकालासंदर्भात महत्त्वाची पत्रकार परिषद दिल्लीमध्ये पार पडली. यामध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या निकालावर संशय व्यक्त केला आहे. तसेच अचानक मतदारांची संख्या वाढल्यामुळे संशय घेतला जात आहे. यानंतर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे.
दिल्लीच्या निवडणुकीमध्ये आपची हार आणि भाजपचा विजय दिसून येत आहे. यावर खासदार संजय राऊत म्हणाले की, “मी कालच दिल्लीत राहुल गांधी यांच्यासोबत पत्रकार परिषद झाली त्यातच सांगितले की, दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न लागू केले. ज्या प्रमाणे राज्यात घृणास्पद कृत्य झाले तेच दिल्लीत दिसत आहे. राज्यात जो प्रौढांचा आकडा दिलाय त्यापेक्षा जास्त मतदान झाले आहे. असंच पॅटर्न दिल्लीत राबवलं गेलं. प्रत्येक मतदारसंघात १५ ते २० हजार मते वाढवली गेली, यातील काही मते जाणार कुठे तर त्यातून बिहारला वळवली आणि आता दिल्लीत वळवली. दिल्ली एक लहान राज्य आहे. नायब राज्यपाल यांच्याकडे अधिकार असतात त्यांनी तिकडे केजरीवाल यांना कामच करून दिले नाही. मी दिल्लीत होतो जागोजागी टेबल टाकून पैसे वाटले जात होते. तक्रार घेऊ नका अशा पोलिसांना अमित शाह यांच्या स्पष्ट सूचना होत्या, आशा प्रकारे निवडणूक लढली नाही,” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्राचा अभ्यास कमी आहे. त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असावी पण अमित शाह यांच्यामुळे शक्य नाही. जर फडणवीस यांनी राहुल गांधी यांचे संसदेतील सभागृहातले भाषण ऐकले असते तर तेव्हा हेच मुद्दे मांडले आहेत. तेव्हा पंतप्रधान यांचा चेहरा पडला होता. कशाप्रकारे मतदान वाढवले गेले हे सगळे प्रधानमंत्री यांच्या समोर राहुल गांधी बोलले. फडणवीस यांनी अभ्यास करावा. फ्रॉड भाग्याचे हे सरकार आहे,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
दिल्लीच्या निवडणुकीबाबत अपडेट घ्या एका क्लिकवर
खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांची मातोश्री दिल्लीत आहे. त्यांना रात्रीच जावे लागते तेव्हा ते भेटत असतात. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. ठाणे वल्यांना ही एक जुनी खाज आहे स्वतःचे झाकून ठेवायचे आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायचे. एकनाथ शिंदे यांचे प्रमुख दिल्लीत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यामधील एक गट फडणवीस यांच्यासोबत आहे,” असा मोठा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.