लोकसभा, विधानसभेनंतरही भाजपमध्ये इन्कमिंग सुरुच; 'या' बड्या नेत्याने केला पक्ष प्रवेश (File Photo : BJP)
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यासाठी मतदानही झाले. त्यानंतर आता या निवडणुकीसाठीची मतमोजणी आज (दि.८) घेतली जात आहे. सकाळी आठ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यात भाजप 42 जागांवर आघाडीवर आहे तर आम आदमी पक्षाने 28 जागांची आघाडी घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता राजधानी दिल्लीत तब्बल 27 वर्षांनंतर ‘कमळ’ फुलताना दिसत आहे.
हेदेखील वाचा : Delhi Election Results : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु; अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया पिछाडीवर
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान झाले होते. मतदानानंतर आम आमदी पार्टी आणि भाजपनेही विजयाचा दावा केला आहे. मात्र, एक्झिट पोलचे अंदाज भाजपच्या बाजूने गेले आहेत. त्यातच आता भाजपने आघाडी घेतल्याचे दिसत असून, यामध्ये बहुमताचा आकडा पार केल्याचे दिसत आहे. तर काँग्रेसला अद्याप एकही जागा जिंकता अथवा आघाडी दिसली नाही. दरम्यान, मतमोजणी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. दिल्लीतील ट्रेंडमध्ये भाजप आघाडीवर आहे. दिल्ली सचिवालयातील उच्च अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यालयात पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारी कागदपत्रे आणि डेटा संरक्षित करण्यास सांगितले आहे.
ग्रेटर कैलाश मतदारसंघांत मतमोजणीच्या चौथ्या फेरीनंतर, भाजपच्या शिखा राय ४ हजारांहून अधिक मतांनी पुढे आहेत. आम आदमी पक्षाचे सौरभ भारद्वाज येथे सातत्याने आघाडी राखत होते, परंतु सध्या ते मागे पडले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली असून ‘आप’ पक्षाला मोठा धक्का बसताना दिसत आहे. मुस्लीमबहुल मतदारसंघातही भाजपाने आघाडी घेतली आहे. ओखला या मतदारसंघात आजवर भाजपाचा विजय झालेला नव्हता. याठिकाणी भाजपचे मनीष चौधरी आघाडीवर आहेत. तर मुस्तफाबाद येथे भाजपाचे मोहन सिंह बिश्ट आघाडीवर आहेत. हा भाजपचा मोठा विजय मानला जात असून आपला धक्का बसला आहे.
विधानसभा निवडणुकीचे चित्र लवकरच समोर येणार
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. येत्या पाच वर्षांत दिल्ली कोणाच्या ताब्यात राहणार हे चित्र दुपारी बारा वाजेपर्यंत स्पष्ट होऊ शकते. बहुतांश एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाची पिछेहाट झाल्याचे दिसून आले असून, भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीत भाजपने आघाडी कायम ठेवली आहे.
भाजप समर्थकांचा जल्लोष सुरू
दरम्यान, भाजप समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे. भाजप ४२ जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष २८ जागांवर आघाडीवर आहे. दिल्ली विधानसभेच्या जागेवर भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात जोरदार लढत आहे. दुसऱ्या फेरीत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांना २५४ मतांनी मागे टाकले आहे.