MP sanjay raut target bjp devendra fadnavis over rahul gandhi article
मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्याचबरोबर बिहारमध्ये देखील निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत लेख लिहून नवीन मुद्दा उपस्थित केला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानावेळी घोटाळा झाला असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या वादावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. खासदार राऊत म्हणाले की, “राहुल गांधी यांनी देशभरातील वृत्तपत्रांमध्ये मुलाखती देऊन ज्या भावना मांडल्या आहेत त्या त्यांनी आधी ही मांडल्या आहेत. सातत्याने राहुल गांधी बोलत आहेत त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही भारतीय जनात पार्टीने चोरली,लुटली दरोडे घातले हे आम्ही देखील बोलत आहोत आणि राहुल गांधी सांगत आहेत. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या टोळ्याचा विजय होऊच शकत नाही,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “सहा महिन्यांपूर्वी लोकसभा आम्ही जिंकल्या होत्या, असं काय झालं की इतका मोठा एकतर्फी विजय तुम्हाला मिळावा. लाडकी बहीण या आवरणाखाली तुम्ही ही निवडणूक हायजॅक केली. मी असं म्हणतो विधानसभेची निवडणूक झालीच नाही. राहुल गांधींनी जे पाच मुद्दे उपस्थित केले ते आंतरराष्ट्रीय पातळीवर केले. मोदी, शहा, फडणवीस यांनी लोकशाही कशी हायजॅक केली, लोकशाही मूल्य कशी पायदळी उडवली, निवडणूक आयोगापासून अनेक संस्था कशा अस्वस्थ करून सोडलेल्या आहेत, आता भाजपाचे लोक म्हणत आहेत की राहुल गांधी यांची विधाने खोटी आहेत या देशांमध्ये खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार हा भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते नरेंद्र मोदी यांना दिला पाहिजे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राहुल गांधींच्या लेखावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहूनच प्रत्युत्तर दिले. यावर टीका करताना खासदार राऊत म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांच्यात अंगाचा तीळ पापड झालेला आहे. देशातील 14 प्रमुख वृत्तपत्राने राहुल गांधी यांचा लेख छापून आल्या मुळे भारतीय जनता पक्ष उघडा पडला आहे. फडणवीस यांनी नवीन ग्रंथ लिहावा, नवीन गीता लिहावी तुमचा विजय कसा झाला अजित पवार, शिंदे कसे जिंकले हे अख्या जगाला माहित आहे. निवडणूक आयोगाने मतदार केंद्रावर सेटिंग केली असं राहुल गांधी म्हणतात, देशातील जनतेला कळल आहे नरेंद्र मोदी आणि कंपनी कशा पद्धतीने निवडणुका जिंकत आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मनाला विचारावा जर ते खरोखर बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेमी असतील तर काय चर्चा झाली हे त्यांच्या मनाला विचाराव. तुम्ही किती भ्रष्ट आहात हे सर्वोच्च न्यायालयाने कमिशन बाजी वर हल्ला केला त्यावरून स्पष्ट होतं,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.