Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी देवेंद्र फडणवीस यांचा लाडका मंत्री, तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ शकतो’; नितेश राणे यांचं विधान

देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि ग्रामविकासमंत्री सुद्धा भाजपचे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रतिनिधी देखील भाजपचाच असायला हवा.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 06, 2026 | 02:37 PM
'मी देवेंद्र फडणवीस यांचा लाडका मंत्री, तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ शकतो'; नितेश राणे यांचं विधान

'मी देवेंद्र फडणवीस यांचा लाडका मंत्री, तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ शकतो'; नितेश राणे यांचं विधान

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : खातं कोणतंही असलं तरी निधी देण्याचा अंतिम अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. काँग्रेसकडे आता उरलंय तरी काय? असा सवाल करत राज्याचे मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर (उबाठा) तोफ डागली. काँग्रेस आणि शिवसेनेला (उबाठा) विचारा तुम्ही विकासासाठी निधी अमेरिकेतून आणणार आहात की, पाकिस्तानमधून? मतदारांनो, काँग्रेस आणि शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवारांना नक्की विचारा तुमच्या नेतृत्वाकडं निधी आणायची हिंमत आहे का? असा सवाल उपस्थित करत मंत्री नितेश राणे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

राधानगरीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री राणे बोलत होते. “जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या आहेत. ग्रामविकासमंत्री तर भारतीय जनता पार्टीचा आहे. मग काँग्रेस आणि शिवसेनेला (उबाठा) मतदान देऊ का? असा प्रश्न तुम्ही उमेदवारांना विचारा. तर सिंधुदुर्गामध्ये शिवसेनेला (उबाठा) मी औषधाला सुद्धा ठेवलं नाही. त्यांना तिकडं उमेदवार मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. मी देवेंद्र फडणवीस यांचा लाडका मंत्री आहे. त्यामुळं तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ शकतो,” असं मंत्री नितेश राणे म्हणाले.

तसेच देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि ग्रामविकासमंत्री सुद्धा भाजपचे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रतिनिधी देखील भाजपचाच असायला हवा. अन्य पक्षांना मतदान करून काही होणार आहे. शिवसेना, काँग्रेस किंवा शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवारांना मतदान करून काय उपयोग आहे. त्यांच्याकडे आहे तरी काय? राधानगरी परिसरात भाजपचे उमेदवार निवडून द्या. या भागातील विकासाची जबाबदारी मंत्री म्हणून माझी असेल, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.

राज्याचे आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा मतदारसंघ असलेल्या राधानगरी तालुक्यात ५ जिल्हा परिषद आणि १० पंचायत समिती गण आहेत. कसबा तारळे, कसबा वाळवे, राधानगरी, राशिवडे या मतदारसंघात भाजपचे उमेदवार आणि राष्ट्रवादी तसेच काँग्रेस यांच्यात लढती होणार आहेत.

कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघात गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांची कन्या अमृता डोंगळे विरुद्ध भाजपच्या ऋतुजा कौलवकर आणि काँग्रेसकडून भाग्यश्री डोंगळे यांच्यात होणारी लढत तालुक्यात लक्षवेधी ठरणार आहे. तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा बालेकिल्ला असलेल्या राधानगरी-भुदरगड तालुक्यात शिवसेनेची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.

हेदेखील वाचा : कपिल शर्मा शोमधील A.R. Rahman च्या उपस्थितीवर नितेश राणेंचा हल्लाबोल; म्हणाले- “हिंदुत्वाशी तडजोड….”

Web Title: I am devendra fadnavis favorite minister i can give you as much funding as you want says nitesh rane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Politics
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
1

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
2

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
3

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.