महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून केलेल्या राहुल गांधी यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
Devendra Fadnavis On Rahul Gandhi: गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ या लोकशाही यंत्रणेत फेरफार करण्यासाठी मॅच फिक्सिंगचा आराखडा तयार करण्यात आला होता. आता हाच प्रकार बिहार निवडणुकीतही होणार आहे. भारतीय जनता पक्षाला जिथे जिथे हार पत्करावी लागते तिथे अशा प्रकारची गैरकृत्ये केली जातात, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर टीकेचा आसूड ओढला आहे. राहुल गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत, ‘ मॅच फिक्सिंग महाराष्ट्र’ असा लेख लिहीला आहे. तसेच, त्यांच्या ट्विटर एक्सवरही हा लेख शेअर केला आहे. या लेखात त्यांनी महाराष्ट्र सरकावर गंभीर आरोप केले आहेत. या लेखानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राहुल गांधी यांच्या टीकेला लेखाने उत्तर दिले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २०२४ मध्ये मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान झाले होते. पण त्यानंतरही ही आकडेवाडी वाढत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मतदानाची अंतिम टक्केवारी 66.05 टक्के असल्याचे सांगण्यात आले. म्हणजेच एकूण मतदानाच्या आकडेवारीत ७.८३ टक्क्यांची वाढ झाली. राज्यातील केवळ १२ हजार मतदान केंद्रांवर अचानक नव्या मतदारांची भर पडली. त्यातील ८३ मतदारसंघात भाजपचा विजय झाला, असा दावा राहुल गांधींनी केला.
राहूल गांधी यांच्या या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देताना म्हटलं आहे की, शेवटच्या तासांत झालेल्या मतदानामुळे एनडीएचा विजय झाला, म्हणणे हास्यास्पद आहे. कामठी मतदार संघाचे उदाहरण मी इथे देत आहे, “माढा मतदासंघात शेवटच्या तासांत १८ टक्के मतदान झाले. पण तिथे शरद पवार गटाचा उमेदवाराचा विजय झाला. वणीमध्ये शेवटच्या तासात 13 टक्के मतदान झाले, तिथे ठाकरे गटाचा उमेदवाराचा विजय झाला. श्रीरामपूरमध्ये 12 टक्के मतदान झाले, त्याठिकाणीही काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला, असं देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले.
आगामी बिहारसह इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये होऊ शकणाऱ्या संभाव्य पराभवासाठी काँग्रेसने आतापासूनच कारणे शोधायला सुरुवात केली आहे, असा घणाघात भाजपाने केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीपासून ते मतदार वाढ आणि मतदान टक्केवारीवरून काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाजपाकडून परखड प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
1950 पासून नवीन कायदा लागू होईपर्यंत 26 पैकी 25 मुख्य निवडणूक आयुक्तांची थेट नियुक्ती काँग्रेस सरकारने केली होती, हे लक्षात घेण्यासारखे आहे. मोदी सरकारने प्रथमच विरोधी पक्षनेता असलेली समिती नियुक्त करून पारदर्शकता आणली. मात्र काँग्रेसला हा लोकशाहीस बळकट करणारा बदल मान्य नाही, अशी टीका करण्यात आली.
कडुलिंब आणि वाटीभर तुपाचा वापर करून १० मिनिटांमध्ये घरीच तयार करा औषधी काजळ, डोळ्यांना मिळेल थंडावा
2024 च्या निवडणुकांमध्ये 40.81 लाख मतदारांपैकी 26.46 लाख युवा मतदार होते. नवीन मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत काँग्रेसच्या शंकांचे निरसन करणारे 60 पानी स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने 24 डिसेंबर 2024 रोजी सादर केले होते. याआधीच्या निवडणुकीतही मोठ्या प्रमाणावर मतदार वाढ झाली होती:
2004-2009 : 1 कोटी नवीन मतदार
2009-2014 : 75 लाख
2014-2019 : 63 लाख
2024 मध्ये काही ‘दिव्य’ घडले असल्याचा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
वाढीव मतदानाच्या मुद्द्यावरही भाजपाने स्पष्टीकरण दिले. दिवसभरात प्रतितास सरासरी मतदान 5.83% होते, तर शेवटच्या तासात 7.83% इतकी वाढ झाली. 2024 च्या दुसऱ्या टप्प्यात 5 वाजता 60.96% मतदान झाले होते, जे पुढे 66.71% वर पोहोचले. यातील 5.75% वाढ ही नैसर्गिक असून, पूर्वीही अशीच नोंद झाली आहे. राहुल गांधी यांनी केवळ एनडीए जिंकलेल्या जागांवर शेवटच्या टप्प्यात मतदान वाढल्याचा आरोप केला. मात्र, माढा (18% वाढ – शरद पवार गट विजयी), वणी (13% वाढ – ठाकरे गट विजयी), श्रीरामपूर (12% वाढ – काँग्रेस विजयी) ही उदाहरणे समोर ठेवत भाजपाने हा दावा खोडून काढला.
भाजपाने राहुल गांधी यांच्यावर वैयक्तिक आणि राजकीय टीका करताना म्हटले, की लोकशाही आणि जनादेशाचा सतत अपमान हा काँग्रेसच्या अधोगतीचे कारण ठरत आहे. स्वतःच्या पराभवाचा बदला जनता आणि देशाच्या संस्थांवर टीका करून घेण्याचा प्रयत्न होत आहे. राहुल गांधी यांना त्यांच्याच पक्षाचे आमदार एक दिवसात भेटत नाहीत, यावरही त्यांनी आत्मचिंतन करावे, अशी टीका करण्यात आली. भाजपाने स्पष्टपणे सांगितले की, महाराष्ट्रातील शेतकरी, महिला व सामान्य जनतेने दिलेल्या कौलाचा असा अपमान केल्यास महाराष्ट्राची जनता काँग्रेसला माफ करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने, महाराष्ट्राच्या जनतेच्या अपमानाचा तीव्र निषेध करण्यात आला.