MP Sanjay Raut's controversial statement while commenting on the flood situation in Maharashtra
Sanjay Raut : मुंबई : महाराष्ट्रामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली असून संपूर्ण आठवड्याभर जोरदार पाऊस पडला आहे. यामुळे राज्यात ओला दुष्काळ आला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण पीक पाण्याने वाहून गेले असून जमीन पाण्याखाली आहे. यावरुन आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. नेत्यांनी बांधावर पाहणी केल्यानंतर पंचनामे आणि मदत लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र यावरुन सरकारवर टीका करताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य करत पूरस्थितीवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला. खासदार राऊत म्हणाले की, नुकतंच खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हा संवाद साधताना खासदार त्यांनी राज्यातील पूरग्रस्त परिस्थिती आणि सरकारच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. आभाळ फाटलंय, जमीन वाहून गेली आहे. अशावेळी पूर्ण मदत ही सरकारकडून व्हायला हवी. पण सरकार क्रिकेट मॅचच्या बंदोबस्ताला लागलं आहे. लोकांना अन्न-पाणी मिळालेले नाही. त्यापेक्षा सरकारने पूरग्रस्त जिल्ह्यात राहून मदतकार्याचा आढावा घ्यावा, अशी टीका खासदार राऊत यांनी केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, मराठवाडा, अहिल्यानगर, बीड या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकणातही पाऊस सुरु आहे. तुमच्याकडे शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी काय योजना आहेत? गमबूट घालून चार तास एक दौरा केलात आणि परत आलात. तुमचे त्या त्या भागाचे पालकमंत्री कुठे आहेत? धाराशिवचे पालकमंत्री एकदा दोन टेम्पो घेऊन गेले, फोटो लावून गेले. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांनी ठाण मांडून बसण्याची गरज असताना, ते मुंबईत काय करत आहेत? या मंत्र्यांना बडतर्फ करा, हा सामाजिक राजकीय गुन्हा आहे. अमानुष आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी मंत्र्यांच्या कारभारवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मात्र पुढे सत्ताधारी मंत्र्यांवर टीका करताना खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली. ते म्हणाले की, तुम्ही पुढच्या वर्षी दांडिया करा. तुम्ही शेतकऱ्यांना काय मदत केली, हे मला दाखवा. आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत. तुम्ही काय मदत केली हे दाखवा. तुमची कोणती मदत पोहोचली हे दाखवा. आम्हाला काय विचारताय, तुम्ही काय केलं म्हणून. सरकार तुमचं आहे. भो*** सरकार आमचं आहे का, आम्हाला कसले प्रश्न विचारताय, ही हरामखोर लोक आहेत. सत्ता कोणाची आहे? सरकार कोणाचं आहे? तिजोरी कोणाच्या हातात आहे? निर्लज्जपणाचा कळस आहे, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली असून यावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.