
MP Sharad Pawar will join NDA Said by Shivsena Sanjay Shirsat
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले की, “भाजपा आणि शिवसेनेकडे इच्छुकांची गर्दी जास्त असल्याने चर्चा सुरू आहेत. कोणता प्रभाग सोडायचा आणि कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे. इच्छुक जास्त आहेत आणि जागा कमी आहेत, म्हणून कोणती जागा घ्यायची आणि लढवायची ही चर्चा होणे गरजेचे आहे. आज किंवा उद्या आमची महायुतीची घोषणा होईल. दोन-चार जागेवर जे अडलेलं आहे, त्यावर मंत्री अतुल सावे आणि मी आज चर्चा करणार आहोत आणि योग्य निर्णय घेणार आहोत,” असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : मायलेकीच्या नात्याला काळीमा! 6 वर्षांच्या मुलीचे नाक आणि तोंड दाबून…, मुलगी नको म्हणून आईकडूनच पोटच्या गोळ्याची हत्या
पुढे ते म्हणाले की, “युती बाबतची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोण कुठे लढणार याची यादी एक-दोन दिवसात फायनल होईल. अतुल सावे आणि मी आज फायनल चर्चा करून, ती यादी भाजपा आणि शिवसेनेच्या वरिष्ठांना पाठवू आणि नंतर जाहीर केली जाईल. शरद पवार हे जास्त काही विरोधी पक्षात राहू शकत नाहीत. त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास बघितला तर त्यांनी अनेक वेळा असे उलटे-सुलटे प्रयत्न केलेले आहेत” असे सूचक वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यामुळे आता शरद पवार हे देखील पुतण्याप्रमाणे एनडीएमध्ये सामील होणार का याची उत्सुकता लागली आहे.
हे देखील वाचा : आंबेगावात राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा; शिवसेनेला डावलल्यास बसू शकतो मोठा फटका
पुढे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले की, “अजित दादा सत्तेमध्ये आहेत. त्यांच्याकडे महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे अजित दादा कोणीकडे जाणार नाहीत. परंतु शरद पवार एनडीए मध्ये येऊ शकतात. शरद पवार यांना एनडीएमध्ये घ्यायचं का नाही? हा निर्णय भाजपचे वरिष्ठ ठरवतील. राष्ट्रवादीची भाजप बरोबर आघाडी आहे आणि आमची युती भाजप बरोबर आहे. म्हणून भाजपची शरद पवार यांच्याबद्दल काय भूमिका असेल ती भाजपने ठरवावी. शरद पवार यांना एनडीए मध्ये घ्यायचं का नाही हे एनडीएच्या नेत्यांनी ठरवायचे आहे, आम्ही पहिल्यापासून सांगत आलो आहेत भाजपची आणि आमची नैसर्गिक युती आहे. इतर घटक पक्ष एनडीएमध्ये येत असतील तर त्याला भाजप जबाबदार राहील आम्ही नाही,” असे देखील मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.