MP Supriya sule on Maha vikas aghadi break down
बारामती : राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालथ होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीचे मित्रपक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. तसेच पराभवाचं खापर मित्रपक्षांच्या माथी मारत आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा ठाकरे गटाने केल्यामुळे महाविकास आघाडी तुटली आहे. यावर आता शरद पवार गट व कॉंग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधून याबाबत त्यांचे मत व्यक्त केले आहे.
महाविकास आघाडीमध्ये सध्या जोरदार भांडणे सुरु असल्याचे दिसत आहे. ठाकरे गट महाविकास आघाडीमधून बाहेर पडला असल्यामुळे महाविकास आघाडी तुटली आहे. तसेच मित्रपक्ष एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करत आहेत. खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुंबई ते नागपूरच्या सर्व निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले आहे. यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “महापालिकेच्या निवडणुका सर्व एकत्र असतानाही आम्ही वेगवेगळ्याच लढत होतो. मागची महापालिकेची निवडणूक आम्ही वेगवेगळीच लढलो होतोत. त्यात नवीन काय आहे? महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. सर्व निवडणुका जर सर्वजण आपआपल्या सोईने लढवायला लागले तर कार्यकर्त्यांनी काय सतरंज्या उचलायच्या का? मग त्यांना न्याय कधी मिळणार? त्यामुळे महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यांना न्याय मिळायला हवा”, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र संबंधित बातम्या एका क्लिकवर
त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि महानगर पालिकेच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत असे म्हणत शिवसेना ठाकरे गट व शरद पवार गट हे स्वबळावर निवडणूका लढण्यासाठी तयार झाले आहेत. तसेच शरद पवार यांनी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले. यामुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये नवीन बदल व युती होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मुंबईपासून नागपूर महापालिका आम्ही स्वबळावरुन लढणार, मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला पाहायचंच आहे, अशी मोठी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. याबाबत आम्हाला उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे म्हणून स्वबळावर लढणार असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.