Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : “धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिलं तर…; अमित शाहांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली तीव्र नाराजी

क्रीडा खात्याची जबाबदारी मिळवण्यासाठी धनंजय मुंडे यांचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी त्यांनी अमित शाहांची भेट देखील घेतली. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 18, 2025 | 03:16 PM
Supriya Sule

Supriya Sule

Follow Us
Follow Us:
  • धनंजय मुंडे यांनी केली दिल्ली वारी
  • धनंजय मुंडे आणि अमित शाहांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंची नाराजी
  • अजित पवार गटावर साधला निशाणा
Maharashtra Politics : बारामती : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे हे चर्चेत आले आहेत. नेहमीच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहिलेले माणिकराव यांनी सदनिका घेताना कागदपत्रांचा घोळ केला. या प्रकरणामध्ये त्यांना न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघाले आहे. यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडे असणारे क्रीडा खाते देखील काढून घेण्यात आले आहे. यामुळे सध्या कोकाटे हे फक्त आमदार राहिले आहेत. याच खात्याची जबाबदारी घेण्यासाठी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे सरसावले आहेत. या संदर्भात त्यांनी दिल्ली वारी देखील केली. यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला.

माणिकराव कोकाटे यांचे खाते काढून घेण्यात आले आहे. तर बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचे देखील मंत्रिपद काढून घेण्यात आले. यानंतर धनंजय मुंडे यांनी थेट दिल्ली वारी केली. धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांची भेट घेतली. पुन्हा अजित पवारांनी घेतलेले क्रीडा खाते हे धनंजय मुंडेंनी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. अमित शाहांकडे यासाठी तगदा लावला आहे. मात्र यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोध केला आहे.

हे देखील वाचा : देवेंद्र फडणवीस सर्वांचा टप्पाटप्प्याने कार्यक्रम करणार…! खासदार संजय राऊतांचा इशारा

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांना परत मंत्रिपद देण्याबाबत वक्तव्य केले आहे. खासदार सुळे म्हणाल्या की, काल धनंजय मुंडे हे अमित शाहांना भेटण्याचे मला कळाले. हे कळाल्यानंतर मला अत्यंत वाईट वाटले. ज्यांच्यावर इतक्या टोकाचे आरोप झाले त्यांचा याच सरकारने राजीनामा घेतला. आरोपांमध्ये काहीतरी तथ्य असल्याशिवाय सरकार राजीनामा कसा घेईल. संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी अजित पवारांनी संतोष देशमुख यांच्या कन्येला न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला आहे. अशी पार्श्वभूमी असताना देखील धनंजय मुंडेंनी अमित शाहांची भेट घेतली याचं मला आश्चर्य वाटलं, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.

हे देखील वाचा : काँग्रेसच्या पाठीत खुपसला खंजीर? प्रामाणिकपणाचे प्रतीक असलेल्या राजीव सातवांच्या पत्नीचा भाजप प्रवेश

पुढे त्या म्हणाल्या की, अमित शाह आणि धनंजय मुंडे यांच्या या भेटीमागे विकासकामांचं कारण दिलं जात आहे. पण देशाच्या गृहमंत्र्यांकडे विकासाचे काय काम असू शकतं? राज्यामध्ये सत्ता असताना देखील यांच्या आमदाराला दिल्लीला विकासाचे काम घेऊन जावं लागत असेल तर हा सुद्धा मोठा प्रश्नच आहे. मी याकडे राजकीय हेतून पाहत नाहीये. पण ज्याप्रकारे संतोष देशमुख यांची हत्या झाली ते पाहता अमित शाहांनी दिलेली ही भेट आम्हाला खटकली आहे, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.

Web Title: Mp supriya sule upset over dhanajay munde meet amit shah in delhi for ministership

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • Amit Shah
  • dhananjay munde
  • MP Supriya Sule

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
1

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Amit Shah Health Update: अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने दिल्लीकडे रवाना
2

Amit Shah Health Update: अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने दिल्लीकडे रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.