Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhaji Brigade : MPSC पेपरफुटीवरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; MPSC सचिवांच्या तोंडाला काळं फासलं, अध्यक्षांनादेखील दिला इशारा

Sambhaji Brigade : MPSC पेपरफुटीच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत नवी मुंबईत MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासलं. या कारवाईनंतर संतोष शिंदेंनी MPSC अध्यक्ष आणि सरकारवर जोरदार निशाणा साधला.

  • By विवेक
Updated On: Sep 11, 2026 | 03:12 PM
MPSC सचिवांच्या तोंडाला काळं फासलं, अध्यक्षांनादेखील दिला इशारा

MPSC सचिवांच्या तोंडाला काळं फासलं, अध्यक्षांनादेखील दिला इशारा

Follow Us
Follow Us:
  • MPSC पेपरफुटीवरून संभाजी ब्रिगेडचा आक्रमक पवित्रा
  • महेंद्र हरपाळकरांच्या तोंडाला काळं फासल्याचा दावा
  • ‘अध्यक्षांचा पुढचा नंबर’ म्हणत संतोष शिंदेंचा इशारा
 

Sambhaji Brigade : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटीवरून वातावरण चांगलंच तापलं आहे. आता या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेडने थेट आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवी मुंबईत MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर MPSCच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून नवी मुंबई पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी हि माहिती दिली आहे.

संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रवक्ते संतोष शिंदे यांनी या कारवाईचं समर्थन करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “MPSCचा अभ्यास करणाऱ्या 25 लाख विद्यार्थ्यांच्या आणि महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली,” असं त्यांनी यावेळी म्हंटलं. महेंद्र हरपाळकर यांच्या गालावर मारलेली थप्पड ही सरकारला जनतेने दिलेली थप्पड असल्याचंही शिंदे यांनी म्हटलं.

दरम्यान, अन्न व औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेडने याआधीही आंदोलन केलं होतं. 3 ऑगस्ट रोजी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करत सरकारला इशारा दिला होता. मात्र, सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिलं नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

MPSC विद्यार्थ्यांसाठी फडणवीसांचा मोठा निर्णय! ‘सगळ्या मागण्या मान्य’, 8 दिवसांत कारवाईचं आश्वासन; परीक्षेचं रिचेकिंग होणार

“सरकारला ज्या भाषेत समजतं, त्या भाषेत सांगावं लागतं,” असं म्हणत संतोष शिंदे यांनी MPSC अध्यक्ष आणि सचिवांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. राजीनामा न दिल्यास पुढचा नंबर MPSC अध्यक्षांचा असेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

‘ये तो झाकी है, अध्यक्ष अभी बाकी है’

MPSCच्या कारभारावर संताप व्यक्त करताना संतोष शिंदे यांनी आणखी आक्रमक वक्तव्य केलं. “आज केलेली कारवाई झाकी है, अध्यक्ष अभी बाकी है,” असं ते म्हणाले. प्रश्नपत्रिका फुटत असतील, परीक्षा रद्द होत असतील आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल तर आणखी किती वर्षं वाट पाहायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सुप्रिया सुळेंचा शाईफेकीला विरोध

या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. आंदोलन आणि चर्चा लोकशाही मार्गाने व्हायला हवी. काळं फासणं किंवा शाईफेक करणं योग्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, हीच भूमिका असल्याचंही त्यांनी सांगितलं.

MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; ‘MPSC अध्यक्षांचा राजीनामा व्हायलाच हवा’, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी

कोण आहेत महेंद्र हरपाळकर?

महेंद्र हरपाळकर हे डिसेंबर 2025 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीवर काम केलं आहे. अन्न व औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीच्या तक्रारीनंतर त्यांनी तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्याची माहिती दिली होती. हरपाळकर हे 1995 पासून प्रशासनात अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचं सांगितलं जातं.

Web Title: Mpsc paper leak sambhaji brigade mahendra harpalkar black face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • MPSC
  • MPSC Paper Leak
  • Sambhaji Brigade

संबंधित बातम्या

MPSC विद्यार्थ्यांसाठी फडणवीसांचा मोठा निर्णय! ‘सगळ्या मागण्या मान्य’, 8 दिवसांत कारवाईचं आश्वासन; परीक्षेचं रिचेकिंग होणार
1

MPSC विद्यार्थ्यांसाठी फडणवीसांचा मोठा निर्णय! ‘सगळ्या मागण्या मान्य’, 8 दिवसांत कारवाईचं आश्वासन; परीक्षेचं रिचेकिंग होणार

MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; ‘MPSC अध्यक्षांचा राजीनामा व्हायलाच हवा’, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी
2

MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; ‘MPSC अध्यक्षांचा राजीनामा व्हायलाच हवा’, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी

Supriya Sule on MPSC Paper leak : MPSC पेपरफुटीवर सुप्रिया सुळे आक्रमक; ‘चूक यंत्रणेची आणि सरकारची’, आत्महत्येच्या धमकीचा फोन ?
3

Supriya Sule on MPSC Paper leak : MPSC पेपरफुटीवर सुप्रिया सुळे आक्रमक; ‘चूक यंत्रणेची आणि सरकारची’, आत्महत्येच्या धमकीचा फोन ?

Student Suicide: पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमधून समोर आले धक्कादायक कारण…
4

Student Suicide: पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमधून समोर आले धक्कादायक कारण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.