Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : पालिकेत समाविष्ठ भागातील नगरसेवकांना महापौर पदाची संधी द्या; स्थानिक मतदारांची मागणी

पालिकेचे महापौर पद यंदा सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) यासाठी राखीव झाल्याने, कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 24, 2026 | 03:30 PM
Navi Mumbai : पालिकेत समाविष्ठ भागातील नगरसेवकांना महापौर पदाची संधी द्या; स्थानिक मतदारांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:
  • पालिकेत समाविष्ठ भागातील नगरसेवकांना महापौर पदाची संधी द्या;
  • स्थानिक मतदारांची मागणी
पनवेल ग्रामीण : पालिकेचे महापौर पद यंदा सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) यासाठी राखीव झाल्याने, कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. पालिकेत समाविष्ठ जुन्या नगरपालिका क्षेत्रातील नगरसेवकान ऐवजी इतर वसाहतीमधून निवडून आलेल्या नगरसेवकांना महापौर पदाची संधी देण्यात आली पाहिजे अशी चर्चा परिसरातील मतदारांमध्ये आहे.

2017 साली पनवेल महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीनंतर महापौर पद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने डॉ. कविता चौतमोल यांना महापौरपदाची संधी देत आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्चशिक्षित नेतृत्वाचा संदेश पनवेलकरांना दिला होता.नवीन पनवेल या पूर्वीच्या नगरपालिका क्षेत्रातील प्रभागातून निवडून आलेल्या डॉ. चौतमल यांना सलग पाच वर्ष महापौर पद भूषवण्याची संधी मिळाली. याच कालावधीत सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता म्हणून जवाबदारी सांभाळण्याची संधी केवळ जुन्या नगरपालिका क्षेत्रातील नगरसेवकाना देण्यात आल्याने पालिकेत समाविष्ठ इतर वसाहती मधून निवडून आलेल्या नगरसेवकांनवर अन्याय झाल्याची भावना नगरसेवकांमध्ये आहे. त्यामुळे  खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा तसेच पालिकेत समाविष्ट इतर ग्रामीण भागातुन निवडून आलेल्या नगरसेवकांना पालिकेत नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यास त्या त्या प्रभागातील प्रलंबित प्रश्न (उदा. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते) अधिक प्रभावीपणे सुटण्यास मदत होऊ शकते. सिडको हस्तांतरण प्रक्रियेत असलेल्या वसाहतींसाठी हे अधिक गरजेचे आहे.

गेल्या पाच वर्षांत महापौर, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते ही सर्व महत्त्वाची पदे जुन्या नगरपालिका क्षेत्रातील नेत्यांकडेच राहिली. खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा यांसारख्या नोड्समधून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो, त्यामुळे इथल्या लोकप्रतिनिधींनाही शहराच्या सर्वोच्च पदावर बसण्याची संधी मिळणे, हा त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्याचा एक मार्ग ठरू शकतो.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 29 नगरसेवक! भाजपचे 14 तर राष्ट्रवादीचे अन् शिवसेनेचे…

​प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक

ज्या भागाचा महापौर असतो, त्या भागातील समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष अधिक वेगाने जाते. विशेषतः पाणीपुरवठा सिडको नोड्समधील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे.तसेच हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्थानिक नगरसेवकाचा महापौर पदावर असणे फायदेशीर ठरेल व वाढत्या नागरीकरणानुसार पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यास गती मिळेल.

‘ओबीसी’ आरक्षणाची नवी संधी

​यंदा महापौर पद ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी राखीव झाल्याने, सत्ताधारी पक्षाकडे (भाजप) निवडीसाठी मोठा आवाका आहे. कळंबोली किंवा कामोठे यांसारख्या भागातून निवडून आलेल्या सक्षम ओबीसी नगरसेवकाला संधी देऊन आमदार प्रशांत ठाकूर हे समतोल राखण्याचा प्रयत्न करू शकतात.

राजकीय समीकरणं

जर वसाहतींमधील नगरसेवकांना डावलले गेले, तर आगामी निवडणुकांमध्ये मतदारांमध्ये नाराजी पसरू शकते. याउलट, खारघर किंवा कळंबोलीला नेतृत्व दिल्यास तिथल्या मतदारांचा विश्वास संपादन करणे सोपे जाईल.

चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर होणार; गटनेतेपदी सुरेंद्र अडबाले गट फायनल

 

Web Title: Navi mumbai give the opportunity to the corporators of the areas included in the municipality for the post of mayor demand of local voters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Panvel Rural

संबंधित बातम्या

Mira Bhayander Mayor Reservation :”महापौर मराठीच व्हावा, अन्यथा…” आक्रमक पवित्रा घेत मनसेची बॅनरबाजी
1

Mira Bhayander Mayor Reservation :”महापौर मराठीच व्हावा, अन्यथा…” आक्रमक पवित्रा घेत मनसेची बॅनरबाजी

महानगरपालिकासांठी महापौर आरक्षण सोडत जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये खुला प्रवर्गासाठी आरक्षण
2

महानगरपालिकासांठी महापौर आरक्षण सोडत जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये खुला प्रवर्गासाठी आरक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.