संग्रहित फोटो
विशेष म्हणजे हे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांमधून (हलफनाम्यांतून) ही माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दंगल, मारहाण, छेडछाड,
फसवणूक, धनादेश न वटणे, लाचलुचपत, पत्नीवरील मानसिक व शारीरिक अत्याचार, शासकीय कामात अडथळा, जमीन घोटाळा तसेच शस्त्र परवाना नियमांचे उल्लंघन अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
या यादीत दोन महिला नगरसेविकांचाही समावेश आहे, ही बाब विशेष लक्षवेधी ठरते. यापैकी एका महिला नगरसेविकेवर तब्बल १० गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, सुमारे नऊ वर्षांनंतर झालेल्या या महापालिका निवडणुकीत एकूण ३४ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यामध्ये भाजपचे १७, राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ आणि शिवसेनेचे ४ उमेदवार होते. यापैकी २९ उमेदवारांना यश मिळाले, तर उर्वरित उमेदवारांचा पराभव झाला.
निवडणूक आयोगाच्या स्पष्ट निर्देशानुसार, सर्व मतदान केंद्रांच्या बाहेर उमेदवारांची सविस्तर माहिती असलेले फलक लावण्यात आले होते. या फलकांवर उमेदवारांचे शिक्षण, उत्पन्नाचे स्रोत आणि त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती देण्यात आली होती. मतदारांनी ही माहिती पाहून स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला मतदान करावे, हा यामागचा उद्देश होता. मात्र प्रत्यक्ष निकाल पाहता, मतदारांनी बहुतांश ठिकाणी पक्षनिष्ठा आणि उमेदवाराची ओळख यालाच प्राधान्य दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ही पहिलीच वेळ नाही. सन २०१७ च्या महापालिका निवडणुकीतही २६ नगरसेवकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघडकीस आली होती. त्यावेळीही खून, खुनाचा प्रयत्न आणि दंगलीसारख्या गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेले नगरसेवक सभागृहात पोहोचले होते. यंदाच्या निवडणुकीतही परिस्थिती फारशी वेगळी नसल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे स्वच्छ प्रतिमा आणि पारदर्शक कारभाराच्या घोषणा दिल्या जात असताना, दुसरीकडे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोकप्रतिनिधी सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम आगामी काळात महापालिकेच्या कामकाजावर आणि शहराच्या कारभारावर कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे सुद्धा वाचा : राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?






