Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Body Election: “कोणत्याही परिस्थितीत महायुती…”; अर्ज मागे घेताना पवारांच्या उमेदवाराचे मोठे विधान

नगराध्यक्षपदाच्या शर्ययतीत ७ उमेदवार राहिले आहेत. उद्या दुपारी ३ पर्यत आणखी कोण माघारी घेणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहहे. मात्र अद्याप राष्ट्रवादीने २ जागांवर तडजोड केलेली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 20, 2025 | 07:37 PM
Local Body Election: "कोणत्याही परिस्थितीत महायुती..."; अर्ज मागे घेताना पवारांच्या उमेदवाराचे मोठे विधान

Local Body Election: "कोणत्याही परिस्थितीत महायुती..."; अर्ज मागे घेताना पवारांच्या उमेदवाराचे मोठे विधान

Follow Us
Close
Follow Us:

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उरला एक दिवस
नगराध्यक्षपदासाठी दाखल झाले एकूण 8 अर्ज
नगरसेवकपदासाठी तब्बल 141 उमेदवारांनी भरला अर्ज

चिपळूण: चिपळूण नगरपालिकेच्या निवडणूकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी आणखी दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये चिपळूण नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार मिलींद कापडी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र प्रभाग ९ व १० मधील जागांचा निर्णय राष्ट्रवादीने भाजप व शिंदे सेनेच्या कोर्टात टाकला आहे.

चिपळूण नगरपालिकेच्या निवडणूकीच्या नगराध्यक्षपदासाठी ८ तर नगरसेवकपदासाठी १४१ अर्ज दाखल झाले होते. महायुतीमधील शिंदे शिवसेनेचे उमेश सकपाळ, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून मिलींद कापडी यांचे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. गेले दोन दिवस या मुद्द्यावरून महायुतीत चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष अन्य दोन जागांवर अडून बसले होते. प्रभाग ९ व १० मधील दोन जागा राष्ट्रवादीला सोडण्याची आग्रही मागणी राष्ट्रवादीची होती.

मात्र त्या जागांवर भाजपने देखील आपले उमेदवार दिले आहेत. त्यामुळे शिंदेसेना व भाजप यांच्यामध्ये देखील चर्चा सुरू होती. तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या स्वतंत्र चर्चा सुरू होत्या. मात्र तोडगा निघत नव्हता. अखेर पालकमंत्री उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादीने महायुतीसाठी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. गुरूवारी दुपारी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरलेले मिलींद कापडी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर प्रभाग ११ अ मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अमृता विलास कोंडविलकर यांनीही अर्ज मागे घेतला आहे.

त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या शर्ययतीत ७ उमेदवार राहिले आहेत. उद्या दुपारी ३ पर्यत आणखी कोण माघारी घेणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहहे. मात्र अद्याप राष्ट्रवादीने २ जागांवर तडजोड केलेली नाही. महायुतीसाठी आम्ही नगराध्यक्षपदाचा अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे आता मित्र पक्षांचा विषय आहे. मित्र पक्षांनीही एक पाऊल मागे येऊन महायुतीचा धर्म पाळावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादीकडून आहे.

महायुतीचा धर्म पाळण्यासाठी राष्ट्रवादीने एक पाऊल मागे घेतले असून याविषयी वरिष्ठांना आम्ही जो शब्द दिला होता, तो आम्ही पाळला आहे. कोणत्याही परिस्थितीत महायुती टिकली पाहिजे ही आमची इच्छा आहे. त्यासाठी नगराध्यक्ष व नगरसेवक या दोन्ही पदांचा मी विचार केलेला नाही. आमदार शेखर निकम यांनी शेवटपर्यंत महायुतीसाठी प्रयत्न करीत आहेत. आता दोन जागांचा निर्णय मित्र पक्षांनी घ्यावयाचा आहे.
मिलींद कापडी, शहराध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार पक्ष

Web Title: Ncp ajit pawar milind kapri withdraws his candidature from chiplun mahayuti maharashtra local body election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 07:37 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Chiplun
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Political News : महाराष्ट्रात गुन्हेगारांना मिळतोय राजाश्रय? पत्नीला जाळून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्याला राष्ट्रवादीची उमेदवारी
1

Political News : महाराष्ट्रात गुन्हेगारांना मिळतोय राजाश्रय? पत्नीला जाळून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्याला राष्ट्रवादीची उमेदवारी

Amravati News : ७ पालिकांची निवडणूक संकटात; अमरावतीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण ठरल्याचा परिणाम
2

Amravati News : ७ पालिकांची निवडणूक संकटात; अमरावतीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण ठरल्याचा परिणाम

Chhatrapati Sambhajinagar: नगराध्यक्षपदासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; सिल्लोड, पैठण आणि वैजापूरमध्ये राजकीय चुरस शिगेला
3

Chhatrapati Sambhajinagar: नगराध्यक्षपदासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; सिल्लोड, पैठण आणि वैजापूरमध्ये राजकीय चुरस शिगेला

नांदेडमध्ये निवडणुकीची रणधुमाळी! ७ नगराध्यक्षपदासाठी ११७ तर १६५ नगरसेवक पदासाठी १ हजार २१० अर्ज
4

नांदेडमध्ये निवडणुकीची रणधुमाळी! ७ नगराध्यक्षपदासाठी ११७ तर १६५ नगरसेवक पदासाठी १ हजार २१० अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.