ncp ekhnath khadse reaction on Rohini Khadse Husband Pranjal Khewalkar arrested at rave party
Eknath Khadse on son-in-law rave party : मुंबई : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे हे चर्चेत आले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली आहे. प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती आहेत. प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये जोरदार टीका सुरु झाली आहे. या प्रकरणावर आता एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधून एकनाथ खडसे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
एकनाथ खडसे यांनी जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टीमध्ये अटक झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरू होते, त्यावरून असे काहीतरी घडू शकते याचा अंदाज मला येत होता. पुण्यामध्ये जी घटना घडली आहे, ते मी चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. माझे त्यांच्याशी (प्रांजल खेवलकर) बोलणे झालेले नाही. ते अजून पोलिसांच्या ताब्यात आहेत. जर पुण्यात घडलेली घटना खरोखर रेव्ह पार्टी असेल आणि माझे जावई त्यात असतील तर मी त्या गोष्टीचे समर्थन कधीही करणार नाही.” अशी स्पष्ट भूमिका एकनाथ खडसे यांनी घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “पोलीस यंत्रणेने खरोखर चांगल्या पद्धतीने तपास करायला पाहिजे. परंतु काही ठिकाणी असे होते की, पोलीस यंत्रणा तपास व्यवस्थित करत नाही. अशी जनमानसामध्ये प्रतिमा आहे. जर या प्रकरणामध्ये तथ्य असेल तर जावई असो किंवा कुणीही असो त्याचे समर्थन कधी करणार नाही. परंतु जर जाणूनबुजून अडकविण्याचा प्रयत्न केला असेल तर तेही सहन केले जाणार नाही.” असा सूचक इशारा देखील शरद पवार गटातील एकनाथ खडसे यांनी दिला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खडसे आणि महाजन यांचा वाद सर्वश्रूत आहे. एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी खरपूस समाचार घेतला. आमच्यावर अशा पद्धतीची कारवाई केली जाईल किंवा ट्रप रचला जाईल अशी शक्यता होतीच असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत. यावरुन गिरीश महाजन यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले की, “जर ट्रॅप लावला जाणार आहे, याची कल्पना खडसेंना होती तर त्यांनी जावईबापूंना अलर्ट करायला हवे होते. मला वाटते खडसेंच्या म्हणण्याला अर्थ नाही. जे झाले ते मान्य केले पाहिजे. तपासानंतर ज्यांची चूक आहे, त्यांना शिक्षा होईल. काही झाले की, म्हणायचे यात षडयंत्र होते. त्यांनी असे केले, यांनी हे केले, मला वाटते, प्रत्येकवेळी आपल्याबरोबरच षडयंत्र कसे काय होते?” असा खोचक सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे.