Ncp jitendra awhad gives response to sanjay raut for targeting sharad pawar
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीला एकतर्फी यश मिळाल्यानंतर देखील नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. जागावाटप आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप यावरुन अनेक नेते नाराज आहेत. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे देखील नाराज होते. त्याचबरोबर अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांचे कौतुक करुन त्यांना दैवत म्हणाले. यावरुन आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
काय म्हणाले नरहरी झिरवाळ?
नरहरी झिरवाळ हे पक्षामध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार गटामध्ये गेले आहेत. मात्र अनेकदा ते शरद पवार यांची बाजू घेताना दिसत असतात. नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ यांनी शरद पवार यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांना दैवत म्हटले होते. तसेच त्यांचे लोटांगण घालून पाया पडणार असल्याचे देखील नरहरी झिरवाळ म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
नरहरी झिरवाळ म्हणाले की, माझी मागणी एकच आहे. प्रत्येक माणूस तीच मागणी करतोय, विरोदक असो की राष्ट्रवादीचा कुणीही माणूस असो. सगळ्यांना वाटतंय की अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र आले पाहिजे. राजकारणात काही गोष्ट घडून गेली. आम्ही पवार साहेबांना सोडून गेलो. मात्र लोकांनी आम्हाला निवडून दिलं,” असे मत झिरवाळ म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, “दोन्ही पवार एकत्र आले पाहिजे ही पांडुरंगाला विनंती करतो. मी पाडुंरंगाच्या शेजारी पवारसाहेबांना पाहतो. पहाटे शपथ झाली तेव्हा मी दिल्लीला पळून गेल्याची माझ्यावर टीका झाली. बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसले होते. माझी छाती फाडली तर शरद पवार साहेबच दिसतील, असं सांगतानाच मी ज्या दिवशी अजितदादांसोबत गेलो, त्यानंतर शरद पवार यांच्यासमोर गेलो नाही. कोणत्या तोंडाने मी साहेबांपुढे जाऊ? मी साहेबांना प्रभू रामाच्या जवळचं स्थान देतो. प्रभू रामचंद्राच नाव घेऊन मी साहेबांना फसवलं. मला हा निर्णय घ्यायला भाग पडलं, याच मूल्यांकन मीच करू शकतो. आता पवारसाहेबांकडे जाऊन लोटांगण घालून पाया पडणार. आमच्या सारख्या अनेकांचं अवघड झालं आहे. साहेब विचार करतीलच ना? असे मत नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नरहरी झिरवाळ यांच्या या वक्तव्यामुळे शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांना पांडुरंग म्हणणाऱ्या नरहरी झिरवाळ यांना आव्हाडांनी खडेबोल सुनावले आहेत. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का? हा प्रश्न मला कधीही विचारु नका. झिरवाळ यांनी नौटंकी वगैरे करायची गरज नाही. शरद पवार माणूस आहेत आणि त्यांना हृदय आहे. दैवत म्हणत आहेत, दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का? झिरवाळांना उपसभापती कुणी बनवलं होतं? शरद पवार यांच्या दुःखाचा विचार केला आहे का? आम्हाला सत्ता चाटण्याची गरज प्रत्येकवेळी वाटत नाही, अशा कडक शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी नरहरी झिरवाळ यांच्यावर टीका केली.