Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: महायुती फुटणार? “कोणाच्या भरवशावर…”; अजित पवारांची आमदारांना तंबी

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवार यांनी पक्षाच्या तयारीवर भर दिल्याचे पाहायला मिळाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 29, 2025 | 04:17 PM
Maharashtra Politics: महायुती फुटणार? “कोणाच्या भरवशावर…”; अजित पवारांची आमदारांना तंबी
Follow Us
Follow Us:

राज्यात लवकरच होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
सुप्रीम कोर्टाने दिले निवडणुका घेण्याचे आदेश
महायुती स्वतंत्रपणे लढणार की एकत्रित याची चर्चा सुरू

मुंबई: येत्या काही दिवसांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या निवडणुका महायुतीबरोबर लढणार की स्वतंत्र, याबाबतची चाचपणी सुरू झाली आहे. मात्र, पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील सर्व आमदारांना कठोर तंबी दिली असून, मुंबईत थांबू नका, मतदारसंघात जाऊन कामाला लागा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवार यांनी पक्षाच्या तयारीवर भर दिला. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. कोणाच्या भरवशावर अवलंबून राहू नका. विनाकारण मुंबईत राहू नका, मतदारसंघात पक्षाचे काम करा,” अशा सूचना त्यांनी दिल्या.

पक्षाची बैठक प्रत्येक मंगळवारी पार पडते आणि यावेळी ती रात्री मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये झाली. अजित पवार यांनी आमदारांना सांगितले, “आपापल्या मतदारसंघात तयारी सुरू करा. निवडणुकांचे आव्हान मोठे आहे, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय राहावे, अशा सूचना त्यांनी नेत्यांना दिल्या.

अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी दौरा केला. पहाटेपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात त्यांनी वारजे, आहिरेगाव, धायरी आणि नांदेड सिटी परिसरातील विकासकामांची पाहणी केली. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रुपाली चाकणकर आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Ajit Pawar : वसईकर, कुठे जाऊन बसता तुम्ही? अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं

वारजेतील चौधरी चौकापासून दौऱ्याची सुरुवात करताना अजित पवार यांनी वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुर्दशा आणि नागरिकांच्या तक्रारींबाबत माहिती घेतली. नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी व विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

धायरी व नांदेड सिटी परिसरात पाहणीदरम्यान वारजे-शिवणे पुलाच्या उंचीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यास हा पूल पाण्याखाली जात असल्याने पुलाची उंची वाढवण्याचे आदेश त्यांनी तत्काळ दिले. तसेच धायरी डिपी रोड आणि कात्रज चौक उड्डाणपुलाच्या कामांचा आढावा घेत कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, पाहणीदरम्यान पीएमआरडीएचे एक अधिकारी वेळेवर न आल्याने पवार संतप्त झाले. वसईकर, कुठे जाऊन बसता तुम्ही? असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांना सर्वांसमोर फटकारले.

Web Title: Ncp leader and dcm ajit pawar said to our mla prepare for local body election maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 04:10 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Local Body Election 2025
  • Maharashtra Politics
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा
1

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
3

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग
4

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.