Buldhana Khamgaon Car-Truck Accident
याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजाच्या पुरवठा साखळीचा तपास सुरू आहे. शनिवारी रात्री सुमारे १०.३० वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील टेंभुणा फाटा उड्डाणपुलावर एमएच ३० / एएफ ८३८५ क्रमांकाची कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कारमधील दोघांना बाहेर काढून उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र, या दोघांचाही मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनांची तपासणी सुरू असताना कारमधून उग्र वास येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी कारची अधिक तपासणी केली असता मागील सीटवर पोत्यामध्ये पॅक केलेल्या २५ पुड्यांमध्ये गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला. वजन केले असता त्याचे प्रमाण २६.६७० किलो भरले.
या पदार्थाची किंमत १३ लाख ३३ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले, तर अपघातग्रस्त कारची किंमत पाच लाख रुपये असल्याने एकूण १८ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी सागर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, या अंमली पदार्थांचा उगम, पुरवठा साखळी आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.
टेंभुणा फाटा उड्डाणपुलावरील भीषण अपघातामुळे कारमधील दोघांचा मृत्यू झाला. मात्र, याच अपघातामुळे कारमध्ये लपवून ठेवलेल्या २६.६७० किलो गांजासदृश पदार्थांचा प्रकार उघडकीस आला. अपघात झाला नसता, तर या कारमधून एवढ्या मोठ्याप्रमाणात अंमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती समोर आली असती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महामार्गावरून अंमली पदार्थांची वाहतूक होत असताना नियमित तपासणी यंत्रणेचे लक्ष कुठे होते? अपघातामुळे हा प्रकार उघड झाला.
Washim News: वाशिम जिल्ह्यात वाढतोय साथरोगांचा प्रादुर्भाव; आरोग्य विभागाचे काळजी घेण्याचे आवाहन
Ans: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील टेंभुर्णा फाटा उड्डाणपुलावर हा अपघात झाला.
Ans: या भीषण अपघातात कारमधील दोन जणांचा मृत्यू झाला.
Ans: पोलिसांना कारमध्ये २६.६७० किलो गांजा सापडला.






