Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपाने काँग्रेसला संस्कृती व संस्कार शिकवू नये, मोदी-शाहांची भाषा बघा मग बोला; हर्षवर्धन सपकाळांची टीका

दुसऱ्यांचे चारित्रहनन करणाऱ्यांनी काँग्रेसला संस्कृती व संस्कार याबद्दल अक्कल शिकवू नये, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 26, 2026 | 05:28 PM
भाजपाने काँग्रेसला संस्कृती व संस्कार शिकवू नये, मोदी-शाहांची भाषा बघा मग बोला; हर्षवर्धन सपकाळांची टीका

भाजपाने काँग्रेसला संस्कृती व संस्कार शिकवू नये, मोदी-शाहांची भाषा बघा मग बोला; हर्षवर्धन सपकाळांची टीका

Follow Us
Follow Us:
  • भाजपाने काँग्रेसला संस्कृती व संस्कार शिकवू नये
  • मोदी-शाहांची भाषा बघा मग बोला
  • हर्षवर्धन सपकाळांची टीका
मुंबई : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाच्या नेत्यांनी आकांडतांडव सुरु केला आहे. भाजपाचे नेते व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काँग्रेस नेत्यांबद्दल कोणती भाषा वापरतात, याची त्यांना आठवण नसावी. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे चारित्रहनन करण्यात मोदी-शाह पासून गल्लीतील नेतेही मागे नाहीत. दुसऱ्यांचे चारित्रहनन करणाऱ्यांनी काँग्रेसला संस्कृती व संस्कार याबद्दल अक्कल शिकवू नये, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

 

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना काँग्रेसची विधवा म्हटले, राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरचे शब्द वापरले. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांना राज्यसभेत शूर्पणखा असे म्हटले. पचास करोड की गर्लफ्रेंड, ममता बॅनर्जी यांच्याबद्दल दीदी ओ दीदी असे अनेक शब्द पंतप्रधान मोदी यांनी वापरले. दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांचे भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत चारित्र्यहनन केले. मल्लिकार्जून खरगे यांनी उत्तराखंड मध्ये एक जाहीर सभा घेतल्यानंतर त्या जागेचे कथित शुद्धीकरण करण्यात आले, त्यावेळी भाजपा मुग गिळून गप्प बसली होती.

दुसऱ्याची संस्कृती काढण्याआधी स्वतःची संस्कृती पहावी. ज्या पक्षाचा सर्वोच्च नेताच अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा जाहीरपणे वापरतो, महिलांबद्दल अपमानकारक भाषा वापरतो त्यांनी काँग्रेसला शिकवू नये. खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाची इकोसिस्टिम जागी झाली आहे. त्यांचा हा प्रकार म्हणजे आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट, असा आहे.

हे सुद्धा वाचा : पुरंदर तालुक्यात दुहेरी हत्याकांड! वृद्ध दाम्पत्याला धारदार शस्त्राने संपवलं; कारणही आलं समोर

भारतीय जनता पक्षाचे सरकार मागील १३ वर्षांपासून सत्तेत आहे. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जनतेला सांगण्यासारखे भाजपाकडे काहीही नाही म्हणून ते मुद्दा बनवू पहात आहेत. मोदी सरकारच्या मंत्र्यांचे नाव अत्यंत अघोरी व अश्लाघ्य एपस्टिन फाईलमध्ये आलेले आहे, त्यांना तोंड दाखवायला जागा नाही. राहुल गांधी यांनी मोदी-शाह व भाजपाला सळो की पळो करून सोडले आहे. भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून ते कशाचेही भांडवल करू पहात आहेत पण जनता सुज्ञ आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाला प्रत्युत्तर का दिले?

    Ans: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावरून भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपच्या नेत्यांच्या भाषेवरही प्रश्न उपस्थित केले.

  • Que: हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर कोणते आरोप केले?

    Ans: भाजपचे नेते विरोधी पक्षांच्या नेत्यांचे चारित्र्यहनन करतात आणि महिलांबद्दल अपमानास्पद भाषा वापरतात, असा आरोप सपकाळ यांनी केला. हे आरोप त्यांनी राजकीय टीकेदरम्यान केले.

  • Que: भाजपच्या टीकेबाबत सपकाळ यांनी काय म्हटले?

    Ans: खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपने मोठा मुद्दा निर्माण केला असून, सरकारच्या अपयशावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has criticized narendra modi and amit shah nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 05:28 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Harshvardhan Sapkal
  • narendra modi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi: अमित शाह यांच्यावरील वक्तव्य प्रकरणात राहुल गांधींना दिलासा; सुलतानपूर न्यायालयाने केले निर्दोष मुक्त
1

Rahul Gandhi: अमित शाह यांच्यावरील वक्तव्य प्रकरणात राहुल गांधींना दिलासा; सुलतानपूर न्यायालयाने केले निर्दोष मुक्त

Congress-BJP Controversy: ‘मोदी का बाप भी जाएगा…’; खर्गेंच्या वक्तव्याने भाजपचा तिळपापड, देशभरात आंदोलनाची घोषणा
2

Congress-BJP Controversy: ‘मोदी का बाप भी जाएगा…’; खर्गेंच्या वक्तव्याने भाजपचा तिळपापड, देशभरात आंदोलनाची घोषणा

Purnekar Murder Case : पूर्णेकर हत्याकांडाच्या तपासावर सपकाळांचे प्रश्नचिन्ह; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
3

Purnekar Murder Case : पूर्णेकर हत्याकांडाच्या तपासावर सपकाळांचे प्रश्नचिन्ह; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

मोठी बातमी ! मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला; ‘त्या’ फोटोमुळे अडचणींत वाढ?
4

मोठी बातमी ! मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला; ‘त्या’ फोटोमुळे अडचणींत वाढ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.