Manikrao Kokate on Ministry of Agriculture removed
Manikrao Kokate First Reaction : पुणे : मागील आठवड्यापासून अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. माणिकराव कोकाटे हे अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधाने यामुळे चर्चेत असतात. यानंतर माणिकराव कोकाटे हे तब्बल 22 मिनिटे विधीमंडळाच्या सभागृहामध्ये जंगली रमी खेळताना दिसून आले. यानंतर आता माणिकराव कोकाटे हे विधीमंडळात गेम खेळल्यानंतर त्यांना क्रीडा हे खाते देण्यात आले आहे. यावर आत माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माणिकराव कोकाटे यांनी अनेकदा शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील वक्तव्ये केली आहेत. यानंतर त्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये जंगली रमी गेम खेळली. दुर्दैवाने महाराष्ट्र राज्य हे शेतकरी आत्महत्येमध्ये देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. असे असताना कृषीमंत्री गेम खेळत असल्यामुळे टीका केली जात होती. त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांनी शासनाला भिकारी देखील म्हटले होते. यावरुन त्यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना माणिकराव कोकाटे यांनी खूप आनंदी असल्याचे वक्तव्य केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यामध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना कृषीमंत्रिपद काढून घेतल्याबाबत माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. यावेळी माणिकराव कोकाटे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे. माझी वाटचाल पुढे चालू राहणार आहे, अशा भावना माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केल्या.
त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांना क्रीडा क्षेत्र देण्यात आले असून कृषी क्षेत्र हे अजित पवारांचे विश्वासू असलेले दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना माणिकराव कोकाटे म्हणाले की, “दत्तात्रय भरणे हे शेतकरी पुत्र आहेत, त्यांना मी मदत करेन. त्यांना हे खाते सोपवल्यामुळे खात्याला न्याय मिळेल. जेव्हा गरज पडेल, तेव्हा मी दत्तात्रय भरणे यांची मदत करेन. मी नाराज नाही, मी अत्यंत खूश आहे,” अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता पुन्हा माणिकराव कोकाटे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महायुतीमधील अनेक नेते वादग्रस्त विधाने करत आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. धनंजय मुंडे हे बीडमधील वाढत्या गुन्हेगारीमुळे अडचणीत आले. तर माणिकराव कोकाटे हे थेट शासनाला भिकारी म्हणाले. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला तर माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलण्यात आले. याबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “माणिकराव कोकाटे हे आमचे ज्येष्ठ आहेत. वरिष्ठांनी त्यांना मंत्रिपद दिलं हे योग्यचं आहे. तर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद मागणी केली याची मला कल्पना नाही,” असे म्हणत या विषयांवर जास्त बोलणे दत्तात्रण भरणे यांनी टाळले आहे.