(Photo - X)
सोलापूर : पाण्याअभावी गाव सोडण्याची वेळ आल्याचं सांगत ‘तुळशी गाव विकणे आहे’ असा बॅनर लावणाऱ्या माढा तालुक्यातील तुळशी गावात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भेट दिली. गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी त्यांनी ५० लाख रुपयांची मदत दिली. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. (Sharad Pawar Drought Tour)
राज्यातील दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. याच माढा मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.
यावेळी पवार यांनी १९७२ च्या दुष्काळाची आठवण सांगितली. त्यावेळी आपण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना दुष्काळग्रस्तांना शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न केला होता, असं त्यांनी नमूद केलं.
माढा तालुक्यातील तुळशी गावातील पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केलं होतं. पिण्याच्या पाण्यासाठी होणारी धावपळ आणि दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणींकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी गाव विकण्याचा बॅनर लावला होता. या बॅनरची राज्यभर चर्चा झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली होती. आता खुद्द शरद पवार गावात पोहोचल्याने ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या.
गावातील परिस्थिती जाणून घेतल्यानंतर शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांचा धनादेश खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. या मदतीसोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
मराठवाड्यातील दुष्काळी दौरा पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. दुष्काळावर कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्र्यांना लेखी सूचना दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामती दौऱ्यावर येतील, तेव्हा सुप्रिया सुळे आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांना शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी वेळ मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Ans: माढा तालुक्यातील तुळशी गावात भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. याकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी 'तुळशी गाव विकणे आहे' असा बॅनर लावला होता. याच परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शरद पवार यांनी गावाला भेट दिली.
Ans: शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांचा धनादेश खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
Ans: होय. मराठवाड्यातील दुष्काळी दौरा पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.






