मराठवाड्यात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढणार; अनेक कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या पक्षात प्रवेश
हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. असे असताना हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई येथे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.
आखाडा बाळापूर व परिसरामध्ये परिसरात मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी गाव तिथे शाखा स्थापन केल्या जात असून, सामाजिक कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. कळमनुरी तालुक्यातील एका गावातील सरपंच उमेश आप्पा बोचरे, आखाडा बाळापूर येथील ग्रामपंचायत सदस्य सुभाष ठमके, विनायक हेंद्रे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई येथे हिंगोली जिल्हा पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे जनरल सेक्रेटरी आमदार शिवाजीराव गरजे, माजी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हिंगोली जिल्हाध्यक्ष बी डी बांगर, प्रदेश उपाध्यक्ष ठाकूर सिंग बावरी युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष आमले, युवक जिल्हा उपाध्यक्ष बालाजी जाधव यांची उपस्थिती होती.
यापूर्वीही झाले अनेक प्रवेश
यापूर्वीही अनेक प्रवेश झाले आहेत. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवेश कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये प्रमुख प्रवेश करणाऱ्यांमध्ये अभिजीत पवार आणि हेमंत वाणी यांचा समावेश आहे. दोन्ही नेत्यांचे जितेंद्र आव्हाड यांच्याशी जवळचे संबंध असल्यामुळे या प्रवेशाने खूपच महत्त्व घेतले आहे. यासोबतच काँग्रेसचे कार्यकर्ते चंद्रकांत दायमांनाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले.