Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दापोलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश; योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ‘धनुष्यबाण’ हाती

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हा प्रवेश करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 24, 2026 | 12:59 PM
पिंपरी-चिंचवड शिवसेनेची कार्यकारिणीच बरखास्त; कामचुकार पदाधिकाऱ्यांची आता गय नाही

पिंपरी-चिंचवड शिवसेनेची कार्यकारिणीच बरखास्त; कामचुकार पदाधिकाऱ्यांची आता गय नाही

Follow Us
Follow Us:

दापोली : राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अनेक नेते-कार्यकर्ते आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. असे असताना आता दापोली तालुक्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हा प्रवेश करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही काळात योगेश कदम यांच्या कार्यशैलीने आणि विकासाभिमुख धोरणांनी अनेक कार्यकर्त्यांना आकर्षित केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त करत विविध पक्षांतील कार्यकर्ते शिवसेनेकडे वळत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका युवक अध्यक्ष विजय मुंगशे, पिंट्या माने, आसूदचे उपसरपंच राकेश माने, आंजर्लेचे सरपंच मेघना मंगेश पवार, उपसरपंच प्रथमेश केळस्कर, वैभव धामणे, शिल्पा माने, संजना केळस्कर, स्वप्निल कलमकर, सिद्धी संदीप पवार आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास

या सर्वांनी योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षाच्या विचारधारेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, नदीम मुकादम, सुनिल दळवी, भगवान घाडगे, पप्पु रेळेकर, स्वरुप महाजन, सुधीर कालेकर, रोहिणी दळवी, दिप्ती निखार्गे आदी उपस्थित होते.

भाजप-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

दुसरीकडे, जत शहराच्या राजकारणात रोज नवनवीन उलथापालथ होत असल्याचे दिसून येत आहे. जतच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना घडली. भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षांतील मोठ्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. दोन विद्यमान नगरसेवकांसह विविध पक्षांच्या प्रभावी कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे हाती घेतलेले निशाण, आगामी जत नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षासाठी शुभ संकेत मानले जात आहेत.

हेदेखील वाचा : Rajya Sabha Election : पक्षांतर्गत कलहामुळे काँग्रेसचे समीकरण बिघडलं; आता प्रतिष्ठेची बनली लढाई

Web Title: Ncp workers join shiv sena in dapoli express confidence in yogesh kadam leadership

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
3

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
4

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.