Bihar Election 2025: 'एनडीए'चा अंतर्गत वाद मिटला? बिहार विधानसभेसाठी 'या' दिवशी पहिली यादी येणार? वाचाच...
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा
दोन टप्प्यांमध्ये होणार विधानसभा निवडणूक
एनडीएची यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता
BJP-NDA News: बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याची घोषणा केली आहे. दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. बिहार विधानसभेचा निकाल 14 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. दरम्यान सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत एनडीएची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीआधी एनडीएमध्ये जागावाटपावर एकमत झाल्याचे दिसून येत आहे. एनडीएमध्ये सर्व जागांवर एकमत झाल्याचे समजते आहे. एनडीए बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी 13 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे. 13 ऑक्टोबर रोजी जाहीर होणारी यादी ही संयुक्तिक असण्याची शक्यता आहे.
भाजप, जेडीयू, एलजेपी आणि अन्य सहकारी पक्षांची अशी एकत्रित यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यावेळी जागावाटपावर सहमती करण्याची जबाबदारी भाजपवर देण्यात आल्याचे समजते आहे. चिराग पासवान, जीतनराम मांझी, उपेंद्र कुशावाह यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी भाजपवर असल्याचे समजते आहे.
भाजपने देखील आपली तयारी पूर्ण केली आहे, असे समजते आहे. प्रत्येक जागेसाठी तीन उमेदवारांचे पॅनल तयार करण्यात आले आहे. आता या नावांची चर्चा दिल्लीत होणार असून, दिल्लीतच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. भाजप नेत्यांची चिराग पासवान यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते आहे.
Bihar Elections 2025: बिहार राजकारणाचा ‘किंगमेकर; एकही आमदार नसलेल्या पक्षाच्या नेत्याचे मत निर्णायक
जागा वाटपाबाबत मतभेद कायम
या बैठकीद्वारे, लोकजनशक्ती पक्षाने (राम विलास) एनडीएमधील जागा वाटपाबाबतच्या आपल्या मागण्या बळकट करण्याचा प्रयत्न केला. सूत्रांचे म्हणणे आहे की चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील पक्ष ४० ते ५० जागांची मागणी करत आहे, तर भाजपने अंदाजे २० जागा प्रस्तावित केल्या आहेत. एनडीएनेही चार अटी घातल्या आहेत. परिणामी, जागा वाटपाबाबत मतभेद कायम आहेत.
Bihar Election: सीट शेअरिंग दरम्यान चिराग पासवानच्या पक्षाची तात्काळ बैठक, NDA मध्ये धुसफूस?
NDA मध्ये निर्णायक भूमिका
चिराग पासवान यांनी त्यांचा राजकीय वारसा आणि त्यांचे वडील रामविलास पासवान यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी संपूर्ण पक्षाला एकजूट ठेवण्याचा त्यांचा संकल्प पुन्हा व्यक्त केला. बिहारमधील त्यांचे स्थान पक्षासाठी एक अद्वितीय संपत्ती आहे, जी सर्व आघाडीतील भागीदारांमध्ये निर्णायक भूमिका बजावू शकते. राजकीय तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की लोजपाच्या जागा मागण्या आणि रणनीती बिहार निवडणुकीच्या निकालावर परिणाम करतील.