Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Body Elections 2025: वडगाव नगरपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा उत्साह; नामनिर्देशन प्रक्रिया झाली सुरू

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी नामनिर्देशन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया आजपासून (दि. १० नोव्हेंबर) सुरु झाली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 10, 2025 | 06:24 PM
Nomination process for Vadgaon Nagar Panchayat general elections Maval Political News

Nomination process for Vadgaon Nagar Panchayat general elections Maval Political News

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ : सतिश गाडे : राज्यामध्ये सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांचा उत्साह दिसत असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी नामनिर्देशन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया आजपासून (दि. १० नोव्हेंबर) सुरु झाली आहे. नामनिर्देशन प्रक्रिया ही वडगाव नगरपंचायत कार्यालयात सुरू झाली. ही प्रक्रिया दि. १७ नोव्हेंबरपर्यंत (रविवार, १६ नोव्हेंबर वगळता) सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहणार आहे.

नामनिर्देशन प्रक्रिया सुरु होताच इच्छुकांकडून अर्ज दाखल केले जातात. मात्र नामनिर्देशन आज पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मनिषा तेलभाते व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रविण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात एकूण सात टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

  • टेबल क्र. १ – अनामत रक्कम पथक
  • टेबल क्र. २ – तपासणी पथक (नगराध्यक्ष व प्रभाग क्र. १ ते ४)
  • टेबल क्र. ३ ते ५ – तपासणी पथक (प्रभाग क्र. ५ ते १७)
  • टेबल क्र. ६ – अर्ज स्वीकृती पथक
  • टेबल क्र. ७ – संगणकीकरण व छपाई पथक

नामनिर्देशन पथकात वडगाव नगरपंचायत, पंचायत समिती तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. उमेदवारांना https://mahaseccles.in/ या वेबसाईटवर जाऊन स्वतःची नोंदणी करून नामनिर्देशन व शपथपत्र भरता येणार आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पहिल्या दिवशी म्हणजेच आज (१० नोव्हेंबर) एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झालेले नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, निवडणुकीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थिर देखरेख पथक आणि भरारी पथक स्थापन करण्यात आले असून, निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ४ वाजता या पथकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक रित्या पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.

सर्वसाधारण महिला राखीव – नगराध्यक्षपदासाठी संभाव्य उमेदवारांमध्ये चुरस

नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने स्थानिक राजकारणात नवे समीकरण दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून अबोली मयूर ढोरे यांनी आधीच जनसंपर्क मोहीम सुरू केली असून, महिला वर्गातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर भाजपकडून माजी सभापती गुलाब म्हाळसकर यांच्या कन्या अँड मृणाल म्हाळसकर यांनीही प्रचाराची दिशा घेतली आहे. त्यांच्या प्रत्येक प्रभागात गाठीभेटी,आणि महिलांशी संवाद या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जात आहे. मात्र दोन्ही पक्षांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नसल्याने स्थानिक स्तरावर “कोणावर विश्वास ठेवावा?” असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित झाला आहे.

Web Title: Nomination process for vadgaon nagar panchayat general elections maval political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 06:24 PM

Topics:  

  • Local Body Election 2025
  • maval news
  • political news

संबंधित बातम्या

Bihar Elections: बिहारचे राजकारण कधी गुन्हेगारीमुक्त होईल का? हा प्रश्न आजही कायम
1

Bihar Elections: बिहारचे राजकारण कधी गुन्हेगारीमुक्त होईल का? हा प्रश्न आजही कायम

Local Body Elections 2025: जागा वाटपच्या बैठका ठरल्या वांझोट्या! आश्वासनांचा पाऊस, पण आमदार-खासदार गायब… 
2

Local Body Elections 2025: जागा वाटपच्या बैठका ठरल्या वांझोट्या! आश्वासनांचा पाऊस, पण आमदार-खासदार गायब… 

Amruta Fadnavis: “एक दिवस मुख्यमंत्री करण्यात आलं तर…; अमृता फडणवीस यांनी दिलं हटके उत्तर
3

Amruta Fadnavis: “एक दिवस मुख्यमंत्री करण्यात आलं तर…; अमृता फडणवीस यांनी दिलं हटके उत्तर

Local Body Election 2025: छत्रपती संभाजीनगर नगरपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम, नामनिर्देशन अर्ज विक्री आजपासून सुरु
4

Local Body Election 2025: छत्रपती संभाजीनगर नगरपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम, नामनिर्देशन अर्ज विक्री आजपासून सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.