आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांची भेट घेतल्याने चर्चा उधाण आले (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Local Body Elections 2025: हिंगोली : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजले असून यामुळे राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या कालच्या दौऱ्या दरम्यान भाजपाचा ताफा थेट ठाकरे सेनेचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्या भेटीला पोहोचला. त्यामुळे “टारफे भाजपच्या वाटेवर?” असा प्रश्न राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहे.
काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे टारफे यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला होता आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिंदे सेनेचे संतोष बांगर यांना कडवी झुंज दिली होती. परंतु मागील काही काळापासून त्यांनी ठाकरे सेनेच्या कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवले. उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यातही त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.
कोणती ऑफर देण्यात आली, हे मात्र गुलदस्त्यात
शनिवारी झालेल्या भाजप बैठकीनंतर मंत्री उईके, आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबुराव बांगर, आणि इतर नेत्यांसह टारफे यांच्या घरी गेले. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, कोणती ऑफर देण्यात आली. हे मात्र गुलदस्त्यात आहे. मात्र, टारफे यांनी भाजपात प्रवेश केल्यास हिंगोली आणि कळमनुरी विधानसभा क्षेत्रात भाजायला मजबूत आदिवासी नेतृत्व मिळेल आणि येणाऱ्या नगरपरिषद तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
राजकीय बातम्या वाचणयासाठी क्लिक करा
तर कळमनुरी विधानसभेत भाजपाकडे दोन माजी आमदार संतोष टारफे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला तर कळमनुरी विधानसभा भाजपाचे ताकद वाढणार. भाजपा २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार – असून याची तयारी केली जात आहे. प्रत्येक – मतदारसंघात फील्डिंग लावून भाजप आपले स्थान – पक्के करण्याच्या मनस्थितीत आहे. हा त्याचाच एक भाग आहे.
आमचे जुने संबंध आहेत ही फक्त भेट औपचारिक
आदिवासी विकास मंत्री उईके यांचे आपले फार जुने संबंध आहेत. आदिवासी समाजाच्या विकासासाठी सर्वच नेते एकत्र येतात. काल मंत्री महोदयांचे माझ्या घरी आगमन झाले होते हा त्याचाच एक भाग आहे. आमचे पारिवारिक संबंध आहेत. त्यामुळेच ते घरी आले होते असे सांगत आपला कुठलाही प्रकारचा पक्ष बदलण्याचा विचार नसल्याचे सांगत या भेटीला कोणताही राजकीय रंग नको अशी प्रतिक्रिया माजी आमदार संतोष टारफे यांनी दिली. मात्र यामुळे हिंगोलीच्या राजकीय वर्तुळामध्ये भाकरी फिरणार का याची चर्चा रंगली आहे.






