Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आमदार-खासदार बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, आता त्यांच्यासाठी…’; संजय गायकवाड यांची इच्छा

महायुतीत सर्वच घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आम्हाला आमदार, खासदार बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. आता त्यांच्या निवडणुकीची वेळ आली असताना त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 21, 2025 | 03:17 PM
'आमदार-खासदार बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, आता त्यांच्यासाठी...'; संजय गायकवाड यांची इच्छा

'आमदार-खासदार बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, आता त्यांच्यासाठी...'; संजय गायकवाड यांची इच्छा

Follow Us
Close
Follow Us:

बुलढाणा : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. नेते, पुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांना बळ देऊन मोठे केले पाहिजे. कार्यकर्त्यांसाठी महायुतीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक एकत्र लढावावी, अशी इच्छा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केली.

बुलढाणा येथील ओंकार लॉन्स येथे शनिवारी (दि.20) जिल्हा परिषद, पंचायत समिती व दसरा मेळावा नियोजन बैठक आमदार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, महायुतीत सर्वच घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आम्हाला आमदार, खासदार बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. आता त्यांच्या निवडणुकीची वेळ आली असताना त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. विकासकामांच्या माध्यमातून बुलढाणा शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले. याच कामाच्या बळावर बुलढाणेकर महायुतीला २२ ते २४ जागा मिळवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेदेखील वाचा : Laxman Hake Viral Audio Clip : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी घेतली लाच…? दिला ड्रायव्हरचा UPI ID, ऑडिओ होतोय व्हायरल

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक शिवसेनेच्या विजयासाठी निर्णयक आहेत. कार्यकर्त्यांनी जनतेशी संपर्क ठेवत पक्षाची विचारधारा पोहचवावी. दसरा मेळावा शिवसेनेच्या शक्तीचा आणि परंपरेचा उत्सव असून, प्रत्येकाने यामध्ये सहभागी व्हावे. बंजारा व धनगर समाजाच्या आरक्षणाला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन आमदार गायकवाड यांनी केले.

स्वराज्य पक्ष निवडणुकीच्या रिंगणात?

संभाजीराजे छत्रपती यांचा पक्ष निवडणुकीत उतरणार का यावर त्यांनी भाष्य केले होते. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक विषयांवर भाष्य केले होते. “इतके फटके बसलेत त्यातून बाहेर पडणे अवघड आहे. त्यामुळे स्वराज्य पक्षाने निवडणूक लढवणे असे काही अद्याप ठरवलेले नाही. आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या त्या दुरुस्त करू. निवडणूक लढवण्यापेक्षा लोकांना आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. या दृष्टिकोनातून विचार विनिमय सुरू आहे,” अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी यापूर्वीच घेतली आहे.

Web Title: Now the mahayuti should fight together for party workers expectation of mla sanjay gaikwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Mahayuti
  • political news

संबंधित बातम्या

Ratnagiri News : जयंत पाटील यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; ‘राष्ट्रवादी’चे ‘जोडे मारो’ आंदोलन
1

Ratnagiri News : जयंत पाटील यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; ‘राष्ट्रवादी’चे ‘जोडे मारो’ आंदोलन

Eknath Shinde X account hacked : DCM एकनाथ शिंदे यांचे X अकाउंट हॅक, पाकिस्तानी आणि तुर्की ध्वजांसह फोटो पोस्ट
2

Eknath Shinde X account hacked : DCM एकनाथ शिंदे यांचे X अकाउंट हॅक, पाकिस्तानी आणि तुर्की ध्वजांसह फोटो पोस्ट

Nitin Gadkari : मी ब्राम्हण..आरक्षण नाही हे मोठे उपकार; नितीन गडकरी यांचे आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य
3

Nitin Gadkari : मी ब्राम्हण..आरक्षण नाही हे मोठे उपकार; नितीन गडकरी यांचे आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य

‘संजय राऊत हेच खरे गद्दार, त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली’; राज्यातील ‘या’ कॅबिनेटमंत्र्याचा गंभीर आरोप
4

‘संजय राऊत हेच खरे गद्दार, त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली’; राज्यातील ‘या’ कॅबिनेटमंत्र्याचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.