ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची लाच घेतानाची ऑडिओ क्लिप सोशल मीडिया व्हायरल झाली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Laxman Hake Viral Audio Clip : पुणे : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणावरुन ओबीसी समाज आक्रमक भूमिका घेत आहेत. कुणबी प्रमाणपत्रासह सर्व मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आवाज उठवत आहेत. पण सध्या लक्ष्मण हाके हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. लक्ष्मण हाके यांनी लाच घेण्यासाठी एक अकाऊंट नंबर दिला असल्याचा दावा करण्यात आला आहे. याचा ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाला असून यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांना एका व्यक्तीने फोन करुन 1 लाख रुपये पाठवायचे आहेत ऑनलाईन पेमेंटसाठी डिटेल द्यायला सांगितले. यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या अकाऊंटची माहिती न देता त्यांच्या ड्रायव्हरच्या अकाऊंटची माहिती दिली. सदर व्यक्तीने अकलूजहून कॉल केला असल्याचे सांगत समाजासाठी एवढे काम करत आहात तर पैसे देत असल्याचे सदर व्यक्तीने लक्ष्मण हाके यांना फोनवरुन सांगितले. ड्रायव्हरचा युपीआय नंबर देताच समोरील तरुणाने लक्ष्मण हाकेंवर जोरदार टीका केली. त्यांची लाज काढत त्यांना शिवीगाळ देखील केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सोशल मीडियावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाला आहे. मात्र नवराष्ट्र डिजीटल या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. तसेच दुजोरा देखील देत नाही. या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये युपीआय आयडी शेअर केल्यामुळे सरद व्यक्तीने संताप व्यत्त केला आहे. तसेच लक्ष्मण हाके यांनी लाच घेण्यासाठी त्यांच्या ड्रायव्हरचे अकाऊंट डिटेल दिले असल्याचा दावा केला जात आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की, “एक व्यक्ती मला पैशाची ऑफर करत होता.ओबीसी लढ्यासाठी मी रात्रंदिवस फिरतोय. मला पाच हजारापासून लोक मदत करतात. तो व्यक्ती पहिल्यांदा जय मल्हार म्हणाला. मी अकलूजचा आहे.त्याची इच्छा अशी होती की मला तुम्हाला मदत करायची. तो म्हणाला की गुगल पे पाठवा मी म्हणालो माझ्याकडे तसं काही नाही. परत तो म्हणाला की दुसऱ्या कोणाचा असेल तर द्या मी ड्रायव्हर कडे फोन दिला. त्याने ते रेकॉर्ड केलं आणि व्हायरल केलं. यात जर माझा काय गुन्हा असेल तर मला अटक करा. जेलमध्ये टाका. मी जर लाचखोरी केली असेल तर मला जेलमध्ये टाका.मला बदनाम करणं याच्या व्यतिरिक्त हे काही नाही.नंबरचा ट्रांजेक्शन काढून बघा त्याच्यामध्ये काय झालं असेल तर मला जेलमध्ये टाका. आम्ही ओबीसीची लढाई लढतोय आम्हाला टाका जेलमध्ये.” अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिली आहे.