Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘असली शिवसेना’ जनतेनेच ठरवली! नगरपालिका विजयानंतर शिंदेंचा हुंकार; नवी मुंबई महापालिकेसाठी फुंकले रणशिंग

नवी मुंबईत आयोजित शिवसेना मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मविआ पेक्षा शिवसेनेची ताकता मोठी असल्याचा दावा करत त्यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र दिला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 21, 2025 | 09:20 PM
नगरपालिका विजयानंतर शिंदेंचा हुंकार; नवी मुंबई महापालिकेसाठी फुंकले रणशिंग (Photo Credit- X)

नगरपालिका विजयानंतर शिंदेंचा हुंकार; नवी मुंबई महापालिकेसाठी फुंकले रणशिंग (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • नगरपालिका निकालाने विरोधकांचे ‘पाणीपत’
  • आता नवी मुंबईवर भगवा फडकवणार!
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कार्यकर्त्यांना ‘विजयी’ मंत्र
नवी मुंबई, ता. 21 : नगरपालिका व नगर परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला एकत्रित मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. नवी मुंबईत शिवसेनेची ताकद वाढत असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे गाफील न राहता सर्वांनी एकदिलाने कामाला लागावे आणि नवी मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नवी मुंबई येथे आयोजित शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

नवी मुंबईत ‘शिवसेना’ भक्कम: मोठे पक्षप्रवेश

यावेळी खासदार नरेश म्हस्के, नवी मुंबई मनपाचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, उपनेते विजय नहाटा, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, अंकुश कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या सह अन्य विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये नामदेवराव भगत, शिवराम पाटील, रमाकांत म्हात्रे, मनोज हळदणकर, विजय माने आणि शीतल कचरे यांचा प्रामुख्याने समावेश होता.

हे देखील वाचा: Amol Mohite Satara Election Result: सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला

शिवसेना हा मालक-नोकरांचा नव्हे, तर कार्यकर्त्यांचा पक्ष

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या निवडणुकांमध्ये ‘असली शिवसेना कोणाची’ याचा फैसला जनतेने केला आहे. महाविकास आघाडीचा एकत्रित आकडा सिंगल डिजिटमध्ये राहिला, तर शिवसेनेचा आकडा त्यापेक्षा अधिक आहे. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकांनंतर आता महापालिकेतही महायुतीचाच भगवा फडकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “शिवसेना हा मालक-नोकरांचा नव्हे, तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जो काम करेल तोच पुढे जाईल,” असे ठामपणे सांगत त्यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. शिवसेना आता केवळ मुंबई-ठाण्यापुरती मर्यादित नसून चांदा ते बांधापर्यंत पोहोचली असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवी मुंबईसाठी ‘गेम चेंजर’ प्रकल्प

नवी मुंबईसाठी अडीच वर्षांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सिडकोची घरे, एफएसआय वाढ, टोल नाके हटवणे, पूल व रस्ते प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, ‘तिसरी मुंबई’ ग्रोथ सेंटर यांसारखे प्रकल्प नवी मुंबईसाठी गेम चेंजर ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजना, लखपती योजना, एसटी प्रवास सवलत, उच्च शिक्षण मोफत, शेतकरी सन्मान योजना यांचा उल्लेख करताना “कोई माई का लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही,” असे ठाम आश्वासन त्यांनी दिले.

कार्यकर्त्यांना विजयाचा ‘ॲक्शन प्लॅन’

महापालिका निवडणुकीत शाखा-शाखांमधून काम करा, नाराजी असल्यास संवादातून ती सोडवा आणि विकास हाच अजेंडा ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. “आरोपांना उत्तर कामातून द्यायचे आहे. गाफील राहू नका,” असा संदेश देत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. नवी मुंबईची ही निवडणूक शहराच्या विकासाचा आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्याचा निर्णय करणारी असल्याने सर्वांनी एकदिलाने काम करून महायुतीचा विकासाचा भगवा फडकवावा, असे आवाहन करत त्यांनी भाषणाचा समारोप केला.

हे देखील वाचा: बार्शी नगरपरिषदेवर महायुतीचा झेंडा! नगराध्यक्षपदावर भाजप उमेदवार तेजस्विनी कथले विजयी

Web Title: Now we will hoist saffron over navi mumbai deputy chief minister eknath shindes victorious mantra to the workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 09:19 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Local Body Election
  • Mahayuthi
  • Navi Mumbai
  • shivsena

संबंधित बातम्या

Amol Mohite Satara Election Result: सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला
1

Amol Mohite Satara Election Result: सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला

Solapur BJP Defeat: खासदारांची जादू चालली, पालकमंत्र्यांची लुडबुड संपली; सोलापूरच्या निकालाने भाजपचा गेम ओव्हर
2

Solapur BJP Defeat: खासदारांची जादू चालली, पालकमंत्र्यांची लुडबुड संपली; सोलापूरच्या निकालाने भाजपचा गेम ओव्हर

Nagarpalika Election Results 2025: ‘हा भाजपचा सर्वात मोठा विजय’; फडणवीसांनी मांडली विजयाची ‘ब्लू प्रिंट’, जिथे अपयश आलं, तिथे…
3

Nagarpalika Election Results 2025: ‘हा भाजपचा सर्वात मोठा विजय’; फडणवीसांनी मांडली विजयाची ‘ब्लू प्रिंट’, जिथे अपयश आलं, तिथे…

ठाकरेंनी २७ वर्षात जे कमावलं ते शिंदेंनी गमावलं! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत निवडणुकीचा आश्चर्यकारक निकाल
4

ठाकरेंनी २७ वर्षात जे कमावलं ते शिंदेंनी गमावलं! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत निवडणुकीचा आश्चर्यकारक निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.