सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला
बंडखोरीचा कमळाला फटका
मोहिते यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्णाताई पाटील यांचा पराभव केला त्यांना 1555 मते मिळाली. मात्र दुसरीकडे जिरवा जिरवीच्या राजकारणामध्ये 10 अपक्षांनी कमळचिन्हावरच्या उमेदवारांना फटका दिला. यामध्ये बरेचसे बंडखोर हे उदयनराजे समर्थक असल्याने सभागृहात त्यांना सामावून घेतले जाणार का हा उत्सुकतेचा विषय आहे.
सातारा जिल्हा नगरपालिका निवडणूक निकाल
सातारा नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपा पक्षाचे उमेदवार अमोल मोहिते 42 हजार मतांनी विजयी नगरसेवक
40 भाजपा (उदयनराजे + शिवेंद्रराजे + भाजपा)
09 अपक्ष, 01 शिवसेना शिंदे पक्ष#सातारा_राजकारण #Satara_Politics#सातारा #satara pic.twitter.com/zkyoPQSXWI — राजकारणाचा फड सातारा जिल्हा (@politics_satara) December 21, 2025
हे देखील वाचा: बार्शी नगरपरिषदेवर महायुतीचा झेंडा! नगराध्यक्षपदावर भाजप उमेदवार तेजस्विनी कथले विजयी
प्रभाग क्रमांक 21 मध्ये सागर पावशे यांनी नगर विकास आघाडीचे माजी नगराध्यक्ष व दिग्गज नगरसेवक अशोक मोरे यांचा पराभव करत त्यांची या प्रभागातील सदतीस वर्षाची मक्तेदारी संपुष्टात आणली आहे. या निवडणुकीमध्ये काही दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला यामध्ये अशोक मोने यांच्यासह सातारा विकास आघाडीच्या स्मिता घोडके यांचा समावेश आहे.
नव्या चेहऱ्यांचा उदय आणि दिग्गजांची एक्झिट
हद्दवाढ क्षेत्रातील अनेक नव्या चेहऱ्यांसह सातारा विकास आघाडीचे एडवोकेट दत्ता बनकर नगर विकास आघाडीचे माजी पक्षप्रतोद अविनाश कदम निशांत पाटील मनोज शेंडे अशोक शेडगे,तसेच नगर विकास आघाडीचे फिरोज पठाण विश्वतेज बालगुडे हे नव्या दमाचे उमेदवार निवडून आले आहे. त्यामुळे सातारा पालिकेची आगामी सर्वसाधारण सभा खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक ठरली आहे येथील अन्न वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला 16 टेबलांवर सुरुवात झाली पहिल्यांदा टपाली मतदान मोजण्यात आले .






