Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MLC Election Result 2026 : उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषदेत भाजपचा दणदणीत विजय; बसवराज पाटील 719 मतांनी विजयी

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार बसवराज माधवराव पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार महेश माणिकराव देशमुख यांचा तब्बल 719 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. अंतिम निकालानुसार बसवराज पाटील यांना 844 मते, तर महेश देशमुख यांना 125 मते मिळाली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 22, 2026 | 01:10 PM
उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषदेत भाजपचा दणदणीत विजय; बसवराज पाटील 719 मतांनी विजयी

उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषदेत भाजपचा दणदणीत विजय; बसवराज पाटील 719 मतांनी विजयी

Follow Us
Follow Us:
  • उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषदेत भाजपचा दणदणीत विजय
  • बसवराज पाटील 719 मतांनी विजयी
  • भाजपने राखला गड कायम
धाराशिव : विधानपरिषदेच्या उस्मानाबाद–लातूर–बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत भाजपचे उमेदवार बसवराज माधवराव पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. सोमवारी २२ जून रोजी झालेल्या मतमोजणीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार महेश माणिकराव देशमुख यांचा तब्बल ७१९ मतांनी पराभव केला. अंतिम निकालानुसार बसवराज पाटील यांना ८४४ मते, तर महेश देशमुख यांना १२५ मते मिळाली. त्यामुळे भाजपने हा मतदारसंघ मोठ्या फरकाने आपल्या ताब्यात कायम राखला आहे.

मतमोजणीतील आकडेवारीनुसार बसवराज पाटील यांना टेबल क्रमांक १ वर १८४, टेबल क्रमांक २ वर १४४, टेबल क्रमांक ३ वर १९१, टेबल क्रमांक ४ वर १७७ आणि टेबल क्रमांक ५ वर १४८ अशी एकूण ८४४ मते मिळाली. तर महेश देशमुख यांना अनुक्रमे १०, ५५, ६, २१ आणि ३३ अशी एकूण १२५ मते मिळाली.

नाशिकात महाजन, सामंतांचे प्रयत्न निष्फळ; शेवटी शिंदेंना दणका, छुप्या रणनीतीचा वापर करत गोकुळ गिते विजयी

मतमोजणीदरम्यान १४ मते अवैध ठरली. त्यामध्ये टेबल क्रमांक १ वर ६, टेबल क्रमांक २ वर १, टेबल क्रमांक ३ वर ३, टेबल क्रमांक ४ वर २ आणि टेबल क्रमांक ५ वर २ अवैध मतांचा समावेश होता. या निवडणुकीत एकूण ९८३ मतपत्रिका प्राप्त झाल्या. त्यापैकी १४ मते अवैध ठरल्याने ९६९ वैध मते ग्राह्य धरण्यात आली. निवडून येण्यासाठी आवश्यक असलेला ४८५ मतांचा कोटा बसवराज पाटील यांनी सहज पार करत विजयावर शिक्कामोर्तब केले. या निकालामुळे उस्मानाबाद–लातूर–बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात भाजपची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, निवडणुकीपूर्वी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे महायुतीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर आला होता. या चर्चेचा परिणामही मतदानावर झाल्याची राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा आहे. मतदानाच्या दिवशीच बसवराज पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांचे महायुतीत स्वागत असल्याचं वक्तव्य करून राजकीय संकेत दिले होते.

MLC Election Result 2026 : दुहेरी फटका! ठाकरे गटाला नांदेडमध्ये मोठा धक्का; कृष्णा आष्टीकरांचा पराभव, पक्षातून हकालपट्टी

Web Title: Osmanabad latur beed mlc election result basavaraj patil wins by 719 votes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • BJP
  • Latur
  • MLC Election Result 2026

संबंधित बातम्या

नाशिकमध्ये महाजन, सामंतांचे प्रयत्न निष्फळ; शेवटी शिंदेंना दणका,  छुप्या रणनीतीचा वापर करत गोकुळ गिते विजयी
1

नाशिकमध्ये महाजन, सामंतांचे प्रयत्न निष्फळ; शेवटी शिंदेंना दणका, छुप्या रणनीतीचा वापर करत गोकुळ गिते विजयी

MLC Election Result 2026 : दुहेरी फटका! ठाकरे गटाला नांदेडमध्ये मोठा धक्का; कृष्णा आष्टीकरांचा पराभव, पक्षातून हकालपट्टी
2

MLC Election Result 2026 : दुहेरी फटका! ठाकरे गटाला नांदेडमध्ये मोठा धक्का; कृष्णा आष्टीकरांचा पराभव, पक्षातून हकालपट्टी

MLC Election Result 2026 : महाविकास आघाडीला धक्का! सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा झेंडा; धैर्यशील कदमांचा दणदणीत विजय
3

MLC Election Result 2026 : महाविकास आघाडीला धक्का! सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा झेंडा; धैर्यशील कदमांचा दणदणीत विजय

राज्यात भाजपचा जलवा कायम; विधान परिषद निकालाने शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या, काँग्रेस-शिवसेनेची कामगिरी कशी राहिली?
4

राज्यात भाजपचा जलवा कायम; विधान परिषद निकालाने शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या, काँग्रेस-शिवसेनेची कामगिरी कशी राहिली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.