Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pachgani ZP Election Result: गावपुढाऱ्यांचा माज मतपेटीने उतरवला! बालेकिल्ल्यातच ‘कमळ’ कोमेजले; विश्वासाला तडा की भाकरी पालटली?

भाजपचे माजी तालुकाध्यक्ष श्रीहरि गोळे यांच्या हातगेघर गावात २८९ मते विरोधात गेली, 'सबका साथ, सबका विकास'ची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांच्या गावातव २५१ मते विरोधात गेल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 13, 2026 | 10:57 AM
Pachgani ZP Election Result: गावपुढाऱ्यांचा माज मतपेटीने उतरवला! बालेकिल्ल्यातच ‘कमळ’ कोमेजले; विश्वासाला तडा की भाकरी पालटली?
Follow Us
Close
Follow Us:
  • मतपेटी उघडताच अनेक नेत्यांच्या गावातील आकडे पाहून भाजप पदाधिकाऱ्यांच्या कपाळावर आठ्या
  • शिवसेनेचे संदीप पवार यांना ३३७ मते मिळाली, तर वसंतराव मानकुंबरे यांना अवधी ३१० मते
  • शशिकांत शिंदे यांच्या गावात मानकुंबरे यांना १५८ मते मिळाली
Pachgani News: जावळी तालुक्यातील म्हसवे जिल्हा परिषद गटाची निवडणूक यंदा प्रतिष्ठेची ठरली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुंबरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही लढत लढवली, तर शिवसेनेचे संदीप पवार यांनी काट्याची टक्कर दिली, अखेर निकालात मानकुंबरे यांना ९८९८ मते मिळाली आणि संदीप पवार यांचा अवघ्या २२०० मतांनी पराभव झाला. कागदोपत्री हा विजय असला तरी मतपेटी उघडताच अनेक नेत्यांच्या गावातील आकडे पाहून भाजप पदाधिकाऱ्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

ज्या गावांतून ‘सगळं पैक आहे अशी हमी दिली जात होती, त्याच गावांनी वेगळाच कौल दिला. निवडणुकीच्या प्रचारात अनेक गावपुढारी, माजी पदाधिकारी, साखर कारखान्याचे संचालक, पंचायत समिती सभापती, सरपंच परिषद नेते व्यासपीठावर खुर्चा लावून बसत होते. ‘बाबा, दादा, भाऊ, अण्णा काळजी करू नका, गाव शंभर टक्के तुमचंच!’ अशा विश्वासाच्या घोषणा होत होत्या, पण निकालाने दाखवून दिले की मतदारांनी कोणालाही गृहीत धरले नाही.

Pune Politics: पुणे जिल्ह्याचा १०३२ कोटींचा विकास आराखडा मंजूर; सुनेत्रा पवारांचे मोठे प्रकल्प राबवण्याचे निर्देश

खर्शी बारामुरे विश्वासाला पहिला धक्का

खर्शी बारामुरे या गावात शिवसेनेचे संदीप पवार यांना ३३७ मते मिळाली, तर वसंतराव मानकुंबरे यांना अवधी ३१० मते. म्हणजेच २७ मतांची आघाडी शिवसेनेला, हेच ते गाव, जिथे भाजपचे माजी उपसभापती दत्ता गावडे आणि माजी उपसभापती हनुमंतराव पार्ट यांसारखे दिग्गज नेते सक्रिय होते. व्यासपीठावरून मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या या गावानेच भाजपला धक्का दिला.

आंबेकर तर्फे कुडाळ : हक्काच्या गावात १०० मतांची आघाडी

आंबेकर तर्फे कुडाळ येथे शिवसेनेला तब्बल १०० मतांची आघाडी मिळाली. हे गाव मानकुंबरे यांचे हक्काचे मानले जात होते. विकासकामांची यादी मोठी असतानाही मतदारांनी वेगळा कौल दिला, कोट्यवधींचा विकास झाला, असे व्यासपीठावर सांगणाऱ्या नेत्यांना मतपेटीने वेगळेच उत्तर दिले.

वडाचे म्हसवे : माजी सभापतींच्या गावात १०० मतांची तूट

सर्वांत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या वडाचे म्हसवे गावांत जावळी पंचायत समितीच्या माजीसभापती अरुणा शिर्के आणि त्यांचे पती अजय शिर्के है मानकुंबरे यांच्या प्रत्येक सभेत उपस्थित होते. मात्र त्यांच्याच  गावात मानकुंबरे यांना शिवसेनेपेक्षा शंभर मते कमी पडली. तब्बल ५८० मते विरोधात गेली. माजी सभापतींच्या गावातच अशी स्थिती निर्माण झाल्याने नेमके चुकले कुठे, असा सवाल उपस्थित झाला आहे.

शशिकांत शिंदेंच्या गावात विरोधात पडली १५८ मते

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या गावात मानकुंबरे यांना १५८ मते मिळाली, म्हणजेच त्या गावातही सुमारे १५० मतदार विरोधी गटाचे असल्याचे स्पष्ट झाले. राजकीय समीकरणे किती गुंतागुंतीची आहेत, याचे हे उदाहरण मानले जात आहे.

Shambhuraj Desai News: आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? महायुतीत ठिणगी, शंभूराजे देसाईंनी सुनावले खडे बोल

हातगेघर : सबका साथ, पण गावात साथ का कमी?

भाजपचे माजी तालुकाध्यक्ष श्रीहरि गोळे यांच्या हातगेघर गावात २८९ मते विरोधात गेली, ‘सबका साथ, सबका विकास’ची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांच्या गावातव २५१ मते विरोधात गेल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे. गावपातळीवर मतदारांमध्ये नाराजी होती कार की स्थानिक पात्तळीवरील गटबाजी कारणीभूत ठरली? याचा उहापोह सुरू आहे.

वालूथ : विकासाच्या दाव्यांना मतपेटीचे उत्तर

सरपंच परिषदेचे अध्यक्ष समाधान पौपळे यांच्या पालुय गावात मानकुंबरे यांना ३१३ मते, तर शिवसेनेला २९० मते मिळाली, स्वतः पीपचे उमेदवार असूनही त्याच्या गावात २९० मते विरोधात गेली आणि ते पराभूत झाले. ‘कोट्यवधीचा विकास झाला, या केलेल्या दाव्यावरच सवाल उपस्थित होत आहे.

Web Title: Pachgani zp election result different votes in panchgani zilla parishad bjp in trouble in the leaders stronghold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • Pachgani
  • Panchayat Samiti Election
  • ZP Election Result 2026

संबंधित बातम्या

Shrivardhan Panchayat Samiti Election: श्रीवर्धनमध्ये सत्ता उलथापालथ! मतदारांनी बदलली पंचायत समितीची दिशा 
1

Shrivardhan Panchayat Samiti Election: श्रीवर्धनमध्ये सत्ता उलथापालथ! मतदारांनी बदलली पंचायत समितीची दिशा 

Indapur ZP Election 2026: भाजपचे सर्व दावे ठरले फोल; इंदापूरमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकहाती विजय
2

Indapur ZP Election 2026: भाजपचे सर्व दावे ठरले फोल; इंदापूरमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकहाती विजय

Chhatrapati Sambhajinagar ZP Elecction: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर महिला ‘राज’; ६३ पैकी ३१ जागांवर महिला उमेदवारांचा डंका
3

Chhatrapati Sambhajinagar ZP Elecction: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर महिला ‘राज’; ६३ पैकी ३१ जागांवर महिला उमेदवारांचा डंका

Sangmeshwar Panchayat Samiti 2026: संगमेश्वरवर महायुतीचा झेंडा! १४ पैकी १० जागा जिंकत पंचायत समितीवर मिळवली सत्ता
4

Sangmeshwar Panchayat Samiti 2026: संगमेश्वरवर महायुतीचा झेंडा! १४ पैकी १० जागा जिंकत पंचायत समितीवर मिळवली सत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.