Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai News: पाचगणीच्या वैभवाला अस्वच्छतेचा डाग! बाजारपेठेतील शौचालयांची दुरवस्था; पर्यटकांची मोठी कुचंबणा

शहरात सध्या विविध विकासकामे सुरू आहेत, ज्याचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. परंतु, ज्या गोष्टींचा थेट संबंध पर्यटकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्याशी व सोयीची आहे

  • By anuradha sagar
Updated On: May 06, 2026 | 03:26 PM
Panchgani’s Reputation at Stake: Dilapidated Public Toilets in Main Market Spark Outrage

Panchgani’s Reputation at Stake: Dilapidated Public Toilets in Main Market Spark Outrage

Follow Us
Follow Us:
  • मुख्य बाजारपेठ आणि शॉपिंग सेंटरमधील शौचालयांची दयनीय अवस्था आणि बंद असलेली ई-टॉयलेट्स
  • प्रसाद लक्ष्मण कारंजकर यांचा प्रशासनाला १५ दिवसांची मुदत
  • पर्यटन कर वसूल करूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने विशेषतः महिला पर्यटकांची गैरसोय
 

Panchgani News : पाचगणी पर्यटन स्थळवरील बाजारपेठेतील स्वच्छता गृहाची अवस्था दुर्लक्षामुळे दयनीय झाली आहे. त्यामुळे शहाराच्या वैभवाला अस्वच्छतेचा डाग लागताना दिसत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ आणि शॉपिंग सेंटरमधील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, वारंवार निवेदने देऊनही प्रशासन ढिम्म हलत नसल्याने नगरसेवक  प्रसाद लक्ष्मण कारंजकर यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या १५ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास जाहीर निषेध आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Bengal Violence News : निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसाचाराचा भडका; टीएमसी कार्यालयाला आग, तर कोलकाता मार्केटमध्ये तोडफोड

पाचगणीमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देतात. नगरपरिषदेच्या वतीने पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात पर्यटन कर वसूल केला जातो. मात्र, ही वसुली होत असताना मूलभूत सुविधांच्या नावाने मात्र आनंदीआनंद आहे. मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या महिला पर्यटकांची कुचंबणा होत असून, येथील ई-टॉयलेट्स गेल्या अनेक महिन्यांपासून कुलूपबंद अवस्थेत आहेत. ७ एप्रिलपूर्वी ही कामे पूर्ण होण्याचे आश्वासन हवेतच विरले असून, प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.

शहरात सध्या विविध विकासकामे सुरू आहेत, ज्याचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. परंतु, ज्या गोष्टींचा थेट संबंध पर्यटकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्याशी व सोयीची आहे, त्याकडेच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रसाद कारंजकर यांनी केला आहे. शॉपिंग सेंटरमधील शौचालयांची दुरवस्था ही एक पर्यटन स्थळ म्हणून शहरासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब ठरत आहे. यामुळे शहराची प्रतिमा मलिन होत असून त्याचा थेट फटका स्थानिक व्यवसायावर बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Operation Tiger : राज्यात ‘ऑपरेशन टायगर’चा थरार? संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

येणारे दोन महिने पर्यटनाच्या हंगामाचे (सीझनचे) आहेत. या काळात पर्यटकांची संख्या दुप्पट होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ दखल घेणे आवश्यक आहे. “आम्ही अनेकदा लेखी निवेदने दिली, प्रत्यक्ष पाहणी केली, तरीही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. जर १५ दिवसांच्या आत या शौचालयांचे नूतनीकरण आणि दुरुस्ती काम सुरू झाले नाही, तर आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल,” अशा कडक शब्दांत कारंजकर यांनी प्रशासनाला सुनावले आहे. आता या इशाऱ्यांनंतर तरी सुस्त प्रशासन जागे होणार की पर्यटकांचे हाल कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: Panchgani municipal council panchganis reputation at stake dilapidated public toilets in main market spark outrage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Panchgani News
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : नाट्य परिषद करंडकासाठी साताऱ्यात रंगणार हौशी कलावंतांची स्पर्धा
1

Satara News : नाट्य परिषद करंडकासाठी साताऱ्यात रंगणार हौशी कलावंतांची स्पर्धा

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!
2

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात
3

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी
4

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.