Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : पंकजा मुंडेंचा एकनाथ शिंदेंना झटका; ‘ती’ मान्यताच केली रद्द, 73 कोटी वसुलीचेही आदेश

पर्यावरण विभागाचे एकूण १४ पैकी ११ प्रकल्प शिंदे यांच्या कार्यकाळात मंजूर झाले होते, तर उर्वरित तीन प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 29, 2026 | 08:21 AM
Maharashtra Education Reform

Maharashtra Education Reform

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यातील पर्यावरण व हवामान बदल विभागाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेले तलाव संवर्धन प्रकल्प रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांसाठी वितरित करण्यात आलेली रक्कम व्याजासह परत घेण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती पर्यावरण विभागातून देण्यात आली. भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पर्यावरण विभागाने एकूण १४ तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे.

पर्यावरण विभागाचे एकूण १४ पैकी ११ प्रकल्प शिंदे यांच्या कार्यकाळात मंजूर झाले होते, तर उर्वरित तीन प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आले होते. या सर्व प्रकल्पांची एकूण किंमत सुमारे २८० कोटी रुपयांच्या आसपास होती. त्यापैकी सुमारे ७३ कोटी रुपये आधीच वितरित करण्यात आले होते. आता ही संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करण्याचे आदेश विभागाने दिले आहेत. सुकाणू समितीची १६ फेब्रुवारी २०२६ एक बैठक पार पडली होती. या बैठकीत तलाव संवर्धनाच्या निर्णयांचा आढावा घेतला गेला. यात तलाव संवर्धनाचे ५ प्रस्ताव राज्य तलाव संवर्धन योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार केलेले नसल्याचे आढळले.

तसेच इतर ९ प्रकल्पांच्या बाबतीत पहिला अर्ज सादर करून दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला, तरी संबंधित सुधारीत प्रकल्प अहवाल सादर केले नसल्याचे आढळले. या त्रुटींमुळे फडणवीस सरकारने मागील सरकारच्या काळात मंजूर केलेले प्रकल्प रद्द केले आहेत.

कोणते प्रकल्प केले रद्द?

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मंजुरी दिलेल्या पण फडणवीस सरकारने रद्द केलेल्या ११ प्रकल्पांमध्ये लातूरमधील मुक्तेश्वर, समतानगर आणि औसा तलाव, कर्जत (रायगड) येथील वडप तलाव: परळी (बीड) येथील परंपोक तलाव; अलिबाग (रायगड) येथील बेलोशी तलाव आणि चाळीसगाव (जळगाव) मधील कळमडू, विसापूर, देवळी आणि ब्राह्मणशेवगे या तलावांचा समावेश आहे. या तलावांच्या संवर्धन प्रकल्पासाठी अंदाजे एकूण खर्च २४४.१५ कोटी रूपये निश्चित करण्यात आला होता. त्यापैकी या प्रकल्पांसाठी ७३.३१ कोटी रूपयांचा निधी यापूर्वीच वितरित करण्यात आला आहे.

आर्थिक अनियमितता टाळण्यासाठी निर्णय

सरकारच्या तपासणीत असे आढळले की, काही प्रस्ताव नियमानुसार तयार करण्यात आले नव्हते, तर अनेक प्रकल्पांनी दोन वर्षांहून अधिक काळ सुधारित अहवाल सादर केले नव्हते. त्यामुळे आर्थिक अनियमितता टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकृत आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या निर्णयावर संबंधित नेत्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Eknath Shinde Politics : विधानपरिषदेपूर्वी शिंदेसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! गोऱ्हे आणि बच्चू कडूंना पक्षांतर्गत विरोध

Web Title: Pankaja munde revokes that recognition and orders recovery of 73 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Pankaja Munde

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
1

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
3

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
4

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.