या दोन्ही नावांना शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळातून प्रचंड विरोध
भाजपमध्ये गेलेल्या ‘त्या’ खासदारांना मोठा दिलासा; खासदारकी वाचली; ‘भाजप खासदार’ म्हणून झाली नोंद
या दोन्ही नावांना शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळातून प्रचंड विरोध होत आहे. शिवसेनेतील काही ज्येष्ठ मंत्री आणि नेत्यांनी नीलम गो-हे यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘ज्याप्रमाणे राज्यसभेवर ज्योती वाघमारे यांच्या रूपाने नवा आणि आक्रमक चेहरा दिला गेला, तोच निकष विधान परिषदेसाठीही लावायला हवा,’ असा सूम पक्षात उमटत आहे. जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यापेक्षा निष्ठावंत कार्यकत्यांना वाव् मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे.
विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल असल्याने, उपमुख्यमंत्री एकनाथा शिंदे यांच्याकडे आता केवळ दोन दिवसांचा अवधी उरला आहे. ते पक्षातील नाराजी दूर करून उमदेवार निश्चित करणार का, याकडे लक्ष लागले आहे.
प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्या नावावरूनही शिवसेनेत मोठी नाराजी आहे. ‘बच्चू कडू यांचा शिवसेनेशी संबंध काय?’ असा थेट सवाल काही नेत्यांनी उपस्थित केला आहे. बच्चू कडू यांना जर शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी द्यायची असेल, तर त्यांनी आपली ‘प्रहार जनशक्ती संघटना’ शिवसेनेत विलीन करावी, अशी अट काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवल्याचे समजते. मात्र, या प्रस्तावावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.






