
महायुतीतील वादावर आता पडदा; पक्ष बदलावर नागपुरात निघणार 'हा' तोडगा
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अनेक नेते-पदाधिकारी पक्षांतर करताना दिसत आहे. त्यातच महाराष्ट्रात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा समावेश असलेल्या महायुतीत समन्वय आणि विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी, युतीतील घटक पक्षांमधील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये फोडाफोडीवर (पक्षांतर) बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान भाजप आणि शिवसेनेत झालेल्या जोरदार वादविवाद आणि वक्तव्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे युतीच्या भविष्याबद्दल गोंधळ निर्माण झाला होता. यामुळे जनतेत चुकीचा संदेश गेला आणि विरोधकांना सरकारवर हल्ला करण्याची संधी मिळाली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत या महत्त्वपूर्ण घडामोडींची घोषणा करताना सांगितले की, या संदर्भात शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. चर्चेदरम्यान झालेल्या निर्णयानुसार, आतापासून भाजपा आणि शिवसेना एकमेकांच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षात प्रवेश देणार नाही.
हेदेखील वाचा : Maharashtra Winter Session : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून; शेतकरी कर्जमाफीसह ‘हा’ मुद्दा ठरणार चर्चेचा
महायुतीमध्ये सुसंवाद राखण्यासाठी आणि अनावश्यक संघर्ष टाळण्याच्या दिशेने हा निर्णय एक मोठे पाऊल आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी, महायुतीचे तीन प्रमुख नेते (भाजपा, शिवसेना आणि इतर घटक पक्षांचे प्रमुख नेते) नागपूर येथे होणाऱ्या आगामी विधानसभा अधिवेशनात या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र भेटतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच सोमवारपासून विधीमंडळात हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेले दिसेल. सरकारमध्ये स्थानिक निवडणुकीवरून उफाळलेला अंतर्गत वाद आणि वर्षपूर्तीनिमित्त स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या सरकारचे घोटाळे वेशीवर टांगण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Winter Session: महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात का आयोजित केले जाते? काय आहे त्यामागचा रंजक इतिहास