Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपराजधानीत तयार होतेय ‘नवीन विधानभवन’; CM Devendra Fadnavis यांनी दिले महत्वाचे निर्देश

पुणे ते शिरूर या महामार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग आणि चार पदरी जमिनीच्या समतल (ॲट ग्रेड) मार्गाचे कामांतील तांत्रिक तपशीलबाबत चर्चा बैठकीत करण्यात आली.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 12, 2026 | 09:37 PM
उपराजधानीत तयार होतेय 'नवीन विधानभवन'; CM Devendra Fadnavis यांनी दिले महत्वाचे निर्देश

उपराजधानीत तयार होतेय 'नवीन विधानभवन'; CM Devendra Fadnavis यांनी दिले महत्वाचे निर्देश

Follow Us
Follow Us:

नागपूर नवीन विधानभवनचे काम 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश
विहित कालावधीत कार्यवाही करण्याच्या सूचना
नेरळ -शिरूर या पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाबाबत चर्चा

मुंबई:  नागपूर नवीन विधानभवनचे काम 2028 पर्यंत पूर्ण करण्यात यावे. विधानसभा आणि विधान परिषदेचे सभागृह, मध्यवर्ती सभागृह असलेले मुख्य संकुल, स्वतंत्र प्रशासकीय इमारतीची कामे विहित कालावधीत होण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

बैठकीत नागपूर येथील नवीन विधानभवन मुख्य संकुल व प्रशासकीय इमारत, नेरळ -शिरूर या पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाला पर्यायी नवीन महामार्गासह, अलिबाग- विरार महामार्गाच्या अटल सेतू , मुंबई गोवा महामार्ग, पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग जोडणारे विविध नोड व पुणे–शिरूर सहा पदरी उन्नत मार्गाच्या प्रकल्पाबाबत भूसंपादन, मंजुरी प्रक्रिया, निधी तरतुदी याबाबत चर्चा झाली.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा भार कमी करणाऱ्या नेरळ शिरूर या नवीन महामार्गाबाबात बैठकीत चर्चा झाली. रायगड जिल्ह्यातील कर्जत नेरळ येथून सुरू होणारा हा महामार्ग पुणे -अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर येथे जोडला जाईल. राज्यातील अनेक भागातून येणाऱ्या वाहनांना सोयीस्कर असा हा महामार्ग असेल. या नियोजित महामार्गासाठी आवश्यक मान्यता व निधी तरतुदी बाबत कार्यवाही केली जावी यादृष्टीने यावेळी सूचना देण्यात आल्या.

‘महाराष्ट्र जगात 30 वी अर्थव्यवस्था; ऑस्ट्रिया, थायलंड, बांगलादेशला टाकले मागे’; मुख्यमंत्र्यांची माहिती

यासह वाढणारी वाहतूक आणि भविष्यात वाहनांची संख्या लक्षात घेता, पुणे ते शिरूर या महामार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग आणि चार पदरी जमिनीच्या समतल (ॲट ग्रेड) मार्गाचे कामांतील तांत्रिक तपशीलबाबत चर्चा करण्यात आली. नवीन विधान भवनातील विधानसभेत एकूण 400 आसन क्षमता राहणार असून विधान परिषद सभागृहाची क्षमता 120 तर मध्यवर्ती सभागृहाची आसन क्षमता 700 राहील.

🔸 CM Devendra Fadnavis chaired a meeting of the Cabinet Committee on Infrastructure.
DCM Sunetra Ajit Pawar, Minister ShivendraSinh Raje Bhonsle and concerned officials were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक.… pic.twitter.com/hWLC0uFVex — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 11, 2026

नागपूर येथील नवीन विधानभवन

1920 साली बांधण्यात आलेल्या सध्याच्या विधान भवनाच्या जागी तयार होणाऱ्या नवीन विधानभवन मध्ये विधानसभा आणि विधान परिषदेचे सभागृह, मध्यवर्ती सभागृह यासह समिती कक्ष, पत्रकार कक्ष आदी विधिमंडळ व प्रशासकीय कामकाजासाठी सुविधा असलेले मुख्य संकुल यांचे ए, बी आणि सी ब्लॉकच्या 62 हजार 924 चौरस फूट आराखड्याच्या चार मजली मुख्य संकुलास 662 कोटी रुपये व प्रशासकीय इमारतीसाठी 339 कोटी रुपये तरतूद करण्यात येत आहे.

Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

राज्याच्या विकासासाठी आर्थिक शिस्त राखणे गरजेचे आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक वाठविण्यात आली आहे. महाराष्ट्र देशात आर्थिकदृष्ट्या मजबूत राज्य म्हणून उभे राहत असल्याचे सांगून पुढील काही वर्षांत महाराष्ट्र हे देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले राज्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Web Title: Cm devendra fadnavis said nagpur new vidhan bhavan work to be completed on time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 09:31 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Nagpur
  • National Highways
  • Vidhansabha

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
1

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
2

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना
3

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश
4

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.