PM Narendra Modi wearing footwear to Supporter Rampal Kashyap in haryana political news
हरयाणा : काल (दि.14) देशभरामध्ये मोठ्या उत्साहाने भारतरत्न डॉक्टरबाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली आली. जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी हे हरयाणामध्ये विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. हिसार येथील अग्रेसन विमानतळाहून अयोध्येला जाणाऱ्या पहिल्या विमानाला हिरवा कंदील दाखवला. तसेच यमुना नगरला देखील भेट दिली. पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यामध्ये त्यांनी एका कार्यकर्त्याच्या पायामध्ये स्वतः बूट घातले. राजकीय वर्तुळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीचे कौतुक आणि चर्चा रंगली आहे.
यमुना नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कार्यकर्ते रामपाल कश्यप यांच्या पायामध्ये बूट घातला. रामपाल कश्यप यांच्या 14 वर्षांच्या प्रतिज्ञेचा अखेर पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये शेवट झाला आहे. 14 वर्षे रामपाल यादव यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी पायामध्ये चप्पल न घालण्याचा निर्णय घेतला होता. अखेर पंतप्रधानांच्या हस्ते रामपाल कश्यप यांनी बूट घालून घेतले आहेत. रामपाल यादव यांनी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होई नाहीत आणि ते स्वतः त्यांना भेटत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा निश्चिय केला होता.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंदे समर्थक असलेले रामपाल कश्यप हे हरयाणा मधील कैथल जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी नरेंद्र मोदी भेटत नाहीत तोपर्यंत पायामध्ये चप्पल न घालण्याचा निर्णय घेतला होता. चौदा वर्षांचा हा अनवाणी राहण्याचा वनवास रामपाल कश्यप यांनी पूर्ण केला. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कालच्या हरयाणा दौऱ्यावेळी स्वतः भेटून रामपाल कश्यप यांना बूट घालून दिले. तसेच अशा पद्धतीचा निश्चिय पुन्हा न करण्याचे आवाहन देखील केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर देखील रामपाल कश्यप यांची व्हिडिओ शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “आज यमुनानगर येथील जाहीर सभेत मी कैथल येथील श्री रामपाल कश्यप जी यांना भेटलो. त्यांनी १४ वर्षांपूर्वी एक प्रतिज्ञा केली होती – मी पंतप्रधान झाल्यानंतर ते फक्त पादत्राणे घालतील आणि ते मला भेटू शकले. मी रामपाल जी सारख्या लोकांबद्दल नम्र आहे आणि त्यांचे प्रेम देखील स्वीकारतो पण मी अशा प्रतिज्ञा घेणाऱ्या सर्वांना विनंती करू इच्छितो – तुमचे प्रेम मला खूप आवडते… कृपया सामाजिक कार्य आणि राष्ट्र उभारणीशी जोडलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा!” अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.