Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics: सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी सक्तीच्या रजेवर? जिल्हा परिषद ‘अपहरण नाट्या’चे पडसाद

वरिष्ठ पातळीवरून म्हणजेच पोलीस महासंचालकांकडून याबाबत त्यांना अर्जित रजेच्या आड पडद्याने या प्रकरणाची राजकीय हवा जाईपर्यंत सुट्टीवर पाठवण्यात आल्याची चर्चा आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 30, 2026 | 04:09 PM
Satara SP Tushar Doshi, Vaishali Kadukar IPS Satara,

Satara SP Tushar Doshi, Vaishali Kadukar IPS Satara,

Follow Us
Follow Us:
  • साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी हे सक्तीच्या रजेवर
  • सातारा जिल्हा पोलीस दलाचा कार्यभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या हाती
Satara Politics: सातारा जिल्हा परिषदेच्या अपहरण नाट्य मध्ये निलंबन प्रस्तावामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी हे सक्तीच्या रजेवर गेल्याने हे प्रकरण त्यांना भोवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. प्रत्यक्षात दिनांक 6 एप्रिल पर्यंत पोलिस अधीक्षक दोषी यांनी अर्जित रजा टाकल्याची माहिती पोलीस सूत्रांच्या वतीने देण्यात आली आहे.

Pimpri- Nigdi Metroसाठी आनंदाची बातमी! टिळक चौकात चौथे स्टेशन मंजूर; ५५ टक्के काम पूर्ण

त्यामुळे सध्या सातारा जिल्हा पोलीस दलाचा कार्यभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या हाती सोपवण्यात आला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये भाजपने पोलीस बळाचा वापर करून राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांना अटक करण्यास भाग पाडले. त्यामुळे भाजप सत्तेत येऊन राष्ट्रवादी व शिवसेनेचे संख्या बळ कमी पडले. या गोंधळ नाट्याचे थेट विधान परिषदेमध्ये पडसाद उमटून सातारा जिल्हा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड टीका झाली. या प्रकरणांमध्ये पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाची कार्यकारी समिती चौकशी करेल असे सांगून सातारा पोलीस अधीक्षकांचा बचाव केला.

हॉटेल चालकांनो सावधान ! गॅस टंचाईच्या नावाखाली ग्राहकांकडून जादा पैसे घेणं पडणार

या एकूणच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी तुषार दोशी हे अचानक रजेवर गेल्याने सक्तीच्या रजेची चर्चा सुरू झाली. वरिष्ठ पातळीवरून म्हणजेच पोलीस महासंचालकांकडून याबाबत त्यांना अर्जित रजेच्या आड पडद्याने या प्रकरणाची राजकीय हवा जाईपर्यंत सुट्टीवर पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. पुणे येथील वैद्यकीय चाचणी सत्र पार पाडल्यानंतर तुषार दोशी पुन्हा कामावर हजर झाले त्याचबरोबर त्यांनी पालकमंत्र्यांसमवेत काही बैठकांना उपस्थिती सुद्धा लावली होती. मात्र अचानक झालेल्या रजा प्रकरणाचा संबंध सातारा जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या राजकीय राड्याशी जोडला जात आहे. मात्र सातारा पोलिसांच्या अधिकृत सूत्रांनी या चर्चांचे खंडन केले असून याबाबतचे परिपत्रक जाहीर केले आहे .या परिपत्रकानुसार दिनांक 6 एप्रिल पर्यंत पोलिस अधीक्षक तुषार दोशी हे 6 एप्रिल पर्यंत अर्जित रजेवर असून तोपर्यंत सातारा जिल्हा पोलीस दलाचा कार्यभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर या सांभाळणार आहेत .

Web Title: Political fallout in satara police superintendent tushar doshi on leave until april 6

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • Satara News
  • Satara Politics
  • Satara Zilla Parishad

संबंधित बातम्या

Satara News: साताऱ्याला आधुनिक विकासाची जोड देणार! स्वातंत्र्यदिनी नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे नागरिकांना  आवाहन
1

Satara News: साताऱ्याला आधुनिक विकासाची जोड देणार! स्वातंत्र्यदिनी नगराध्यक्ष अमोल मोहितेंचे नागरिकांना आवाहन

Satara News : दिव्यांगांच्या हातांनी भरले रस्त्याचे खड्डे; प्रशासनाला दिला  संवेदनशीलतेचा धडा !
2

Satara News : दिव्यांगांच्या हातांनी भरले रस्त्याचे खड्डे; प्रशासनाला दिला संवेदनशीलतेचा धडा !

Satara News : गणेश आगमन मिरवणुकीसाठी पाच तारखा निश्चित; पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय
3

Satara News : गणेश आगमन मिरवणुकीसाठी पाच तारखा निश्चित; पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

Satara District Bank Election: जावळीत राजकारण तापणार; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदे-शिवेंद्रराजे आमनेसामने
4

Satara District Bank Election: जावळीत राजकारण तापणार; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदे-शिवेंद्रराजे आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.