
Maharashtra Politics, MLC Elections, Election Results, Pune News,
Maharashtra MLC Election: राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे आज निकाल जाहीर होणार आहेत. पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत पाच जागांसाठी एकूण 182 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. . आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीतील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काही त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकांमध्येही अनेक ठिकाणी बंडखोरी, अपक्ष उमेदवारांचे आव्हान आणि मित्रपक्षांतील मतभेद पाहायला मिळाले. यांमुळे लढतींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे मतमोजणीनंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Shalarth ID Scam : अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात; पगार रोखण्यासह मान्यता रद्द करण्याच्या हालचाली
२३ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानात नागपूर पदवीधर मतदारसंघात ६४.७६ टक्के, पुणे पदवीधर मतदारसंघात ६२.७८ टक्के आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात ५८.६७ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी देण्यात आली होती.
शिक्षक मतदारसंघांमध्ये अमरावती येथे ९१.०८ टक्के, तर पुणे येथे ८५.८७ टक्के मतदान नोंदवण्यात आले. या निवडणुकीत शिक्षक मतदारसंघांमध्ये तुलनेने अधिक मतदान झाले.
नागपूर पदवीधर मतदारसंघ : महाविकास आघाडीचे अभिजीत वंजारी आणि महायुतीचे सुधाकर कोहळे यांच्यात प्रमुख लढत आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघ : भाजपच्या डॉ. स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांच्यासह अन्य उमेदवार रिंगणात आहेत.
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ : या मतदारसंघात सतीश चव्हाण, दिलीप घुगे आणि प्रतापसिंह पाटील यांच्यासह अनेक उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
अमरावती शिक्षक मतदारसंघ : किरण सरनाईक, अदिती पोहरे, संगीता शिंदे आणि दत्तात्रय लहाने यांच्यासह अन्य उमेदवारांमध्ये लढत आहे.
Guwahati Shooting News: गुवाहाटीत रक्ताचा पाठोपाठ! हॉटेलमध्ये बेछुट गोळीबार; महिलांसह ६ जणांच्या
पुणे शिक्षक मतदारसंघ : भाजपचे कौस्तुभ गावडे, सचिन सानप, काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि दत्तात्रय सावंत यांच्यासह अन्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
पाचही मतदारसंघांतील मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळतात, तसेच बंडखोर आणि अपक्ष उमेदवार किती प्रभाव पाडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Ans: पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, छत्रपती संभाजीनगर पदवीधर, पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक या ५ जागांसाठी आज मतमोजणी होत आहे.
Ans: पाचही मतदारसंघांत मिळून एकूण १८२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे.
Ans: या निवडणुकांमध्ये मतपत्रिकांवर पसंतीक्रमाचे (Preference Vote) मतदान होत असल्याने, मतपत्रिकांचे वर्गीकरण करणे, वैध/अवैध ठरवणे आणि 'विजयाचा कोटा' निश्चित करून फेऱ्या मोजणे यात अधिक वेळ लागतो.