राज्यातील शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) या प्रकरणाचा तपास सुरू आहे. विविध कागदपत्रांची छाननी आणि संशयित नियुक्त्यांची पडताळणी केली जात आहे. नाशिक विभागात पहिल्या टप्प्यात १५० शिक्षकांच्या मान्यता रद्द करून त्यांचे वेतन थांबवण्यात आल्याची माहिती आहे. विभागातील एकूण ८९३ संशयास्पद प्रकरणांची छाननी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातही १३२ जणांच्या मान्यता रद्द करून वेतन थांबविण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येते.
लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना ! सातवी ते बारावीच्या मुलींना वर्षाला 6 हजार रुपये
या कारवाईमुळे शिक्षक भरती प्रक्रिया, वैयक्तिक मान्यता आणि वेतन वितरणातील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बनावट कागदपत्रे किंवा नियमबाह्य मान्यता सिद्ध झाल्यास शिक्षकांबरोबरच संबंधित संस्थाचालक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवरही फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे नाशिकमधील ८९३ प्रकरणांच्या छाननीतून कोणती माहिती समोर येते आणि शिक्षण विभाग पुढे कोणती पावले उचलतो, याकडे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
FAQ
प्रश्न 1: शालार्थ आयडी घोटाळा म्हणजे काय?
उत्तर: शालार्थ प्रणालीतील आयडी आणि त्यासंबंधित शिक्षकांच्या नियुक्ती किंवा वेतन नोंदींमध्ये कथित अनियमितता झाल्याच्या प्रकरणाला शालार्थ आयडी घोटाळा असे म्हटले जाते.
प्रश्न 2: शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात का आल्या आहेत?
उत्तर: कथित अनियमित नियुक्त्या किंवा संशयास्पद नोंदींची पडताळणी सुरू असल्यास संबंधित शिक्षकांच्या नियुक्तीच्या वैधतेवर प्रश्न निर्माण होऊ शकतात. मात्र, प्रत्येक शिक्षकाची परिस्थिती स्वतंत्रपणे तपासणे आवश्यक आहे.
प्रश्न 3: शालार्थ आयडी प्रकरणात शिक्षकांचे पगार रोखले जाऊ शकतात का?
उत्तर: संबंधित प्रकरणातील चौकशी, उपलब्ध पुरावे आणि लागू नियमांनुसार वेतनाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. प्रत्यक्ष कारवाईसाठी अधिकृत आदेश तपासणे महत्त्वाचे आहे.






