
Maharashtra Breaking News Today 26.10.2026
26 Oct 2026 10:01 AM (IST)
गेल्या चार महिन्यांपासून दडी मारुन बसलेला मान्सूनचा आता परतीच्या मार्गाने प्रवास सुरू झाला आहे. पण या परतीच्या मार्गावर असतानाच बंगालच्यानिर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील बहुतांश भागांतील हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या हवामान प्रणालीचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवरही होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील काही जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
26 Oct 2026 09:38 AM (IST)
केरळमधील एरणाकुलम जिल्ह्यातून एक अतिशय संतापजनक आणि दुःखद घटना समोर आली आहे. रविवारी पहाटे एका भरधाव मर्सिडीज-बेंज (Mercedes-Benz) लक्झरी कारने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा भीषण अपघात घडवणारा चालक हा अवघ्या १७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा होता, जो आई-वडिलांना न सांगता त्यांची कार घेऊन बाहेर पडला होता. हा अपघात चेरानल्लूर येथील कंटेनर रोडवरील मारापरम्बुजवळ असलेल्या फोर्ड शोरूमसमोर रविवारी पहाटे २:२० वाजण्याच्या सुमारास घडला. अल्पवयीन आरोपी वल्लारपदम येथून कलामासेरीच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना त्याने स्कुटरला मागून जोरदार धडक दिली.
26 Oct 2026 09:30 AM (IST)
पुण्यातील कात्रज-कोंढवा रोडवरील सुखसागरनगर परिसरात कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. १८ वर्षीय तरुणीची छेडछाड करून तिला भररस्त्यात सर्वांदेखत उचलून नेण्याचा (अपहरणाचा) प्रयत्न एका विकृताने केला. मात्र, परिसरातील नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.नागरिकांनी मुलीची वेळीच सुटका करत आरोपीला पकडले आणि त्याला चांगलाच चोप देऊन बिबवेवाडी/कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिले.
जितु किशोरीलाल सरोज (वय ३०, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेचे अंगावर काटा आणणारे CCTV फुटेज आता समोर आले आहे. यामध्ये आरोपी तरुणीचा पाठलाग करून तिला जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न करताना स्पष्ट दिसत आहे.
26 Oct 2026 09:20 AM (IST)
महाराष्ट्राचे आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ('गोकुळ') बहुचर्चित अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी महायुतीने या निवडणुकीत स्वतःचा उमेदवार रिंगणात उतरवण्याची जोरदार तयारी सुरू केली असून, त्या संदर्भात प्रमुख नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा पार पडल्याचे सूत्रांकडून समजते. 'गोकुळ'च्या नव्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी येत्या २९ ऑक्टोबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेतच अध्यक्षपदाचा सस्पेन्स संपणार आहे.
26 Oct 2026 09:10 AM (IST)
सध्या भारत, फ्रान्स आणि जर्मनीसह जगातील अनेक देशांमध्ये सरकारांच्या धोरणांविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन अत्यंत तीव्र झाले आहे. फ्रान्स आणि जर्मनीसारख्या प्रगत देशांत वाढत्या महागाईविरुद्ध विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून जर्मनीमध्ये काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत. भारतातही कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन चर्चेत असतानाच, आता सर्बिया या देशात विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक सत्तापालट घडवून आणला आहे.
गेल्या १५ वर्षांपासून सर्बियाच्या सत्तेवर वर्चस्व गाजवणारे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुचिच (Aleksandar Vučić) यांना संसदीय निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. भ्रष्टाचार, महागाई आणि लोकशाही संस्थांच्या ऱ्हासाविरोधात गेल्या दोन वर्षांपासून लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाठिंबा असलेल्या 'स्टुडंट्स लिस्ट' (Students List) या विरोधी पक्षाने निवडणुकीत तब्बल २५० जागांवर विजय मिळवत बहुमत संपादन केले आहे.
26 Oct 2026 09:00 AM (IST)
मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर लगेचच वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) याने एक मोठा निर्णय घेतला आहे. ३९ वर्षीय पोलार्डने दक्षिण आफ्रिकेच्या 'SA20' या टी-२० लीगमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. 'SA20' लीगच्या लिलावात जोबर्ग सुपर किंग्स (Joburg Super Kings) फ्रँचायझीने पोलार्डला आपल्या ताफ्यात समाविष्ट केले होते. मात्र, आता पोलार्डने थेट सुपर किंग्सच्या व्यवस्थापनाला आपण या हंगामात खेळण्यासाठी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
26 Oct 2026 08:52 AM (IST)
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉकरोच जनता पक्षाने (CJP) दिल्लीत पुकारलेले आंदोलन दिल्ली पोलिसांनी उधळून लावले आहे. CJP चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिल्लीत दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी विमानतळावरच पक्षाचे प्रमुख अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी अभिजित दीपके, सौरभ दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांच्याकडून 'पीस बॉन्ड' (शांततेचे हमीपत्र) लिहून घेतले आणि आंदोलकांना रोखले.
26 Oct 2026 08:43 AM (IST)
Shivsena Supreme Court Hearing: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा आणि बहुचर्चित शिवसेना पक्ष नाव आणि 'धनुष्यबाण' निवडणूक चिन्ह वादाचा खटला आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील या कायदेशीर लढाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, सर्वोच्च न्यायालयात दिवाळीच्या सुट्ट्यांचा खंड पडल्यानंतर आता २३ नोव्हेंबर रोजी या प्रकरणावर अंतिम सुनावणी होणार आहे.ऑगस्ट महिन्यापासून या खटल्याची नियमित सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली होती. साडेतीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्णत्वाकडे गेला असून अंतिम निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
Maharashtra to World Breaking News :
बंगालच्या उपसागरात ‘अर्णव’ (Cyclone Arnab) चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये बॅडमिंटनपटू नितेश कुमारने सुवर्णपदक पटकावून भारताची पदकांची घौडदौड कायम ठेवली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ४ गडी राखून शानदार विजय, मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
दिवाळी सणाच्या तोंडावर भारतीय खाजगी क्षेत्राची कामगिरी गेल्या चार महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे आर्थिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. राज्यातील विविध भागांत परतीच्या पावसाची शक्यता वाढल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक साठवणुकीबाबत सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे.