Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता; राघव चड्ढांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी?

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज विस्कळीत झाले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटींमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 09, 2026 | 08:01 AM
मोठी बातमी ! संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता; राघव चड्ढांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी?

मोठी बातमी ! संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता; राघव चड्ढांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी?

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये सहभागी झालेल्या राघव चड्ढांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या झालेल्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. यापूर्वी चड्ढा यांनी राज्यसभेतील भाजपच्या नवीन खासदारांच्या नाश्त्याच्या बैठकीत पंतप्रधानांची भेट घेतली होती. भाजपचे केंद्रीय नेतृत्व राघव चड्ढांना मोठी भूमिका देणार असल्याची चर्चा आहे.

पंतप्रधानांना भेटल्यानंतर राघव चड्ढांनी लिहिले, ‘ही सकाळ मी नेहमी लक्षात ठेवेन’. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज विस्कळीत झाले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटींमुळे राजकीय वातावरण तापले आहे. १३ ऑगस्ट रोजी अधिवेशन संपल्यानंतर सरकार केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करू शकते, अशी चर्चा आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, सर्वांचे लक्ष नव्या शिक्षणमंत्र्यांवर लागले आहे.

‘आप’मधून भाजपमध्ये सहभागी झालेले राज्यसभा खासदार राघव चड्ढा चर्चेत आहेत. भाजप त्यांना मोठी भूमिका देऊ शकते, असा दावा केला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत, राघव चड्ढा भाजपसाठी एक उपयुक्त अस्त्र म्हणून समोर आले आहेत.

जनरेशन झेडच्या आंदोलनामुळे रणनीती बदलली

राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, जंतरमंतर येथील जनरेशन झेडच्या आंदोलनामुळे भाजपची रणनीती बदलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवीन टीममध्ये अनुभवी चेहऱ्यांपेक्षा अधिक उत्साही चेहऱ्यांचा समावेश असेल. पंतप्रधान मोदी केवळ ‘जनरेशन झेड’सोबत आपले संबंध वाढवत नाहीत, तर २०२९ पर्यंत प्रभावी राहणाऱ्या एका मोठ्या धोरणावरही काम करत आहेत.

भाजप राघव चड्ढांवर लावू शकते डाव

जनरेशन झेडसोबत असलेले त्यांचे घट्ट नाते आणि तीन भाषांवरील प्रभुत्व लक्षात घेता, भाजप पंजाब निवडणुकीत त्यांचा वापर करू इच्छित असल्याची चर्चा आहे. राघव चड्ढा यांनी यापूर्वी भाजपच्या नवीन खासदारांसोबत राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटोही प्रसिद्ध झाले होते. आता त्यांच्या एकांतात झालेल्या भेटीमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

मी पंतप्रधानांचा आभारी

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर राघव चड्ढा यांनी लिहिले, ही एक अशी सकाळ आहे जी मी नेहमी लक्षात ठेवेन. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळाली. आमचे सविस्तर आणि उत्तम संभाषण झाले. त्यांच्या वेळेबद्दल आणि त्यांच्या समजूतदारपणा व मार्गदर्शनाचा लाभ घेण्याच्या संधीबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे.

‘जात प्रमाणपत्र देताना अधिकारी खोडसाळपणा करतात’; मनोज जरांगेनंतर आता नरेंद्र पाटलांचा सरकारला आंदोलनाचा इशारा

Web Title: Possibility of raghav chadha getting an opportunity in the union cabinet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 08:01 AM

Topics:  

  • BJP Politics
  • political news
  • Raghav Chadha
  • Union Cabinet Meeting

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
3

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
4

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.