
हल्लेखोर डरपोक, कुठेतरी लपून बसतात अन्...; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
“हे डरपोक लोक आहेत. कुठेतरी लपून बसतात. तिथून वल्गना करतात. त्यांच्यात हिम्मत नाही. हे एकप्रकारे भाड्याचे लोक आहेत. भाड्याच्या लोकांच्या आधारावर ऑपरेट करणारे लोक आहेत” असं फडणवीस म्हणाले. “निश्चितपणे पोलिसांना यात चॅलेंज येतं ते हे महाराष्ट्रातून ऑपरेट करत नाहीत. देशाच्या बाहेरुन ऑपरेट करतात. केंद्र सरकारच्या ज्या एजन्सी आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्र आणि देशाबाहेरुन ऑपरेट करणाऱ्या या गँगना मुंबई पोलीस नेस्तनाबूत करतील” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“अशा कुठल्याही गँगला घाबरण्याचं कारण नाही. हे डरपोक लोकांचं कार्य आहे. हे घाबरणारे लोक आहेत. कुठेतरी लपून बसतात. तिथून कम्युनिकेशनचा वापर करुन धमक्या देत असतात. आम्ही प्रत्येक धमकी गांभीर्याने घेतो” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. “मुंबई पोलीस प्रोफेशनल पोलीस फोर्स आहे. आजपर्यंत मुंबई पोलिसांनी दाखवून दिलय की, अशा प्रकारचे जे गुन्हेगार आहेत, त्यांना मुंबई पोलीस जेरबंद केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे निश्चितपणे सांगेन, कोणी घाबरण्याचं कारण नाही” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“शेवटी घटना गंभीर आहे, या घटनेच्या अनुषंगाने जे जे करण्याची गरज आहे, ते ते केलं जाईल. टायगर श्रॉफ यांना सुरक्षा आहे. त्यांनी ती सुरक्षा काही कारणाने मागे ठेवली होती. त्यांच्यासोबत सुरक्षा कवच नव्हतं. अशावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. त्या संदर्भातील माहिती पुढे येईल, असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. टायगर श्रॉफ यांचेशी माझे बोलणे झाले. मी टायगर श्रॉफ यांना अश्वस्त केले आहे की ते कुठलीही चिंता करू नये. ज्यांनी हे केलंय त्यांना आम्ही शोधून काढणार, असं देवेंद्र फडणवीसांनी साांगितलं.
Ans: मुंबईतील जुहू परिसरात.
Ans: बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारल्याची माहिती मिळाली आहे.
Ans: आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.