Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तुमच्याविषयी देखील माझी तक्रार..; Rohit Pawar यांचे अजित पवारांना भावनिक पत्र, वाचून येईल डोळ्यात पाणी

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करुन अजित पवारांना पत्र लिहिले आहे. रोहित पवारांच्या या पत्रातील आर्त साद ऐकून डोळ्यात पाणी येत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 30, 2026 | 02:03 PM
MLA Rohit Pawar emotional social media post for Ajit Pawar Political News

MLA Rohit Pawar emotional social media post for Ajit Pawar Political News

Follow Us
Close
Follow Us:
  • रोहित पवारांची खास सोशल मीडिया पोस्ट
  • अजित पवारांना लिहिले पत्र
  • तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय अशा भावना व्यक्त
Rohit Pawar Emotional Post For Ajit Pawar : बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये निधन झाले. त्यांच्या पार्थिवाला काल (दि.29) अग्नी देण्यात आला. यावेळी फक्त पवार कुटुंब नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. अजित पवार यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर आज (दि.30) त्यांचा सावडण्याचा कार्यक्रम झाला. यानंतर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करुन अजित पवारांना पत्र लिहिले आहे. रोहित पवारांच्या या पत्रातील आर्त साद ऐकून डोळ्यात पाणी येत आहे.

आमदार रोहित पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये लिहिले आहे की, “अजितदादांनी जिथं विकासरुपी फुलांची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल, असं कधी स्वप्नातही आलं नाही.. पण नियतीच्या क्रूर खेळापुढं कुणाचं काही चालत नाही.. अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे… मन बर्फाप्रमाणे थिजलंय.. काय झालं, कसं झालं आणि का झालं, या विचाराचं मनातलं काहूर थांबत नाहीये…, अशा भावना रोहित पवारांनी लिहिल्या आहेत.

हे देखील वाचा : पुण्यातील आणखी एक नेता काळाच्या पडद्याआड! माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन

पुढे लिहिले आहे की, “आपल्यात आत्तापर्यंत जे-जे काही संभाषण झालं, चर्चा झाल्या, विशेषतः शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या भावनिक चर्चा, हे सगळं काही एखादा टेपरेकॉर्डप्रमाणे सारखं सारखं कानात घुमतंय. जणू काही तुम्हीच अदृश्य स्वरुपात बोलत आहात असा भास होतोय. तुमची ती काम करण्याची शैली, प्रशासनावर पक्की मांड, राजकारणावर मजबूत कमांड, परखड स्वभाव, हो ला हो आणि नाही ला नाही न करता जे असेल ते स्पष्ट सांगून समोरच्या व्यक्तीसोबत राजकारण न खेळण्याची पद्धत, कामाचा झपाटा, वेळेचं काटेकोर नियोजन या सगळ्याचं आम्हाला अक्षरशः कौतुक आणि आश्चर्यही वाटायचं. सत्ता असो किंवा नसो, कायम तुमचा दरारा वाटायचा, आदरयुक्त भिती असायची. तुमचा सार्वजनिक वावर बघून तुम्हाला न भेटलेल्या अनेकांना तुम्ही फणसाप्रमाणे कठोर वाटायचात पण तीच व्यक्ती जेंव्हा तुमच्या संपर्कात यायची तेंव्हा फणासातील रसाळ आणि मधुर गऱ्याप्रमाणे तुमचा स्वभाव पाहून ती तुमच्या प्रेमात पडायची, याचे आम्ही साक्षीदार आहोत.”

मा. अजितदादांनी जिथं विकासरुपी फुलांची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल, असं कधी स्वप्नातही आलं नाही.. पण नियतीच्या क्रूर खेळापुढं कुणाचं काही चालत नाही.. अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे… मन बर्फाप्रमाणे थिजलंय.. काय झालं, कसं… pic.twitter.com/vxD2KKfybi — Rohit Pawar (@RRPSpeaks) January 30, 2026

“पण अचानक असं काय झालं? दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, दररोज भेटणाऱ्या शेकडो माणसांना मदत करणारा, त्यांची कामं करणारा, पहाटेपासून रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचाच ध्यास घेणारा, सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगाने उर फाटेस्तोवर धावणारा पहाडासारखा माणूस असा एका क्षणात कसा निघून जाऊ शकतो? या प्रश्नाने डोक्याचा भुगा झालाय. पण काही प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात, असं म्हणतात. पण मा. अजितदादांच्या विकासाचा वेगच कदाचित नियतीला आवडला असावा आणि म्हणूनच अजितदादा लोकांसाठी धावत असतानाच त्याच वेगाने नियतीने त्यांच्यावर झडप घातली असावी. या नियतीबाबतच माझी तक्रार आहे.. ती कुठं करायची हे कळत नाही. पण माझा त्या नियतीला प्रश्न आहे, ‘‘आमच्यासारखे लाख नेले असते तरी चाललं असतं, पण आमचा लाखांचा पोशिंदा तू का असा चोरून नेला? एका क्षणात तू लाखो जणांच्या लाखो स्वप्नांची राख का केलीस. दे ना उत्तर.’’

तुमच्याविषयी देखील माझी तक्रार 

“अजितदादा तुमच्याविषयी देखील माझी तक्रार आहे. दोन दिवसांपासून महाराष्ट्र अक्षरशः स्तब्ध आहे.. प्रत्येकाच्या डोळ्यांतला अश्रूचा पूर कमी होत नाहीये.. हुंदके आणि आक्रोश ऐकून काळजात चर्रर्र होतंय.. आपल्या जाण्याने पाठीमागे दुःखाचे असे पाट वाहतील, याची चिंता दादा तुम्ही का केली नाही? एरवी कुणी थोडं जरी चुकलं तर त्याला चार चौघात झाप झाप झापणारे तुम्ही त्या नियतीलाही त्याच जरबेच्या आवाजात का नाही खडसावलं? महाराष्ट्राची अजून कित्येक कामं बाकी असताना वेळ न घेता तू अशी आलीच कशी? दादा, तुमचा आवाज ऐकूणच ती नक्की घाबरली असती. पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही. मोकळ्या हाताने तिलाही माघारी पाठवलं नाही. आलेल्या प्रत्येकाचं काम करायचं, हेच तर तुमचं वैशिष्टय होतं. पण दोन दिवसांपासून दुःखाच्या पुरात आकंठ बुडालेला महाराष्ट्र पाहून आता त्या नियतीलाही नक्कीच पश्चात्ताप होत असेल.”

हे देखील वाचा : अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; यापुढे ना प्रचार ना सभा

दादा… कुठं हरवलात तुम्ही?

पुढे रोहित पवारांनी लिहिले आहे की, “दादा काय बोलू? आज तुमची राख जमा करत असताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतूनही अचानक त्याच रुबाबात उभं रहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात आम्हाला म्हणाल, ‘‘अरे वेड्यांनो, का अश्रू ढाळताय? मी तुमची गंमत करत होतो? एखाद्या संकटाला सामोरं जाण्याची तुमची किती तयारी आहे हे ‘मॉक ड्रील’प्रमाणे चेक करत होतो.. आता उठा, कामाला लागा… महाराष्ट्रासाठी, इथल्या सामान्य माणसासाठी आपल्याला खूप काम करायचंय.. चला, उशीर नका करु…’’दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय, अशा भावना आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांबाबत व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Mla rohit pawar emotional social media post for ajit pawar political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Rohit Pawar: “आधी तुमची उधळपट्टी थांबवा मग जनतेला सांगा!”; पंतप्रधान मोदींच्या ‘बचत’ मंत्रावर रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल
1

Rohit Pawar: “आधी तुमची उधळपट्टी थांबवा मग जनतेला सांगा!”; पंतप्रधान मोदींच्या ‘बचत’ मंत्रावर रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची रिक्त जागा कोणाला? भुजबळांच्या माघारीमुळे पेच वाढणार
2

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची रिक्त जागा कोणाला? भुजबळांच्या माघारीमुळे पेच वाढणार

Sunreta Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा; बारामतीतील ऐतिहासिक विजयानंतर विधानसभेवर स्वारी!
3

Sunreta Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा; बारामतीतील ऐतिहासिक विजयानंतर विधानसभेवर स्वारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.